Elon Musk X Fine : युरोपियन युनियनने इलॉन मस्क यांच्या X (आधीचे Twitter) कंपनीवर तब्बल 12 हजार कोटी रुपये इतका दंड ठोठावला आहे. ब्लू टिक (Blue Tick) प्रणालीतील बदल, पारदर्शकता (Transparency) नियमांचे उल्लंघन आणि पब्लिक डेटावर रिसर्चर्सना प्रवेश न देणे या कारणांमुळे EU आणि अमेरिका यांच्यात प्रचंड तणाव (Tension) निर्माण झाला आहे. त्यातून युरोपियन युनिनयने हा दंड लावल्याची चर्चा आहे.
Xच्या ब्लू टिकमुळे वाढला वाद (Blue Tick Controversy)
इलॉन मस्क यांनी 2022 मध्ये ट्विटर खरेदी केल्यानंतर ब्लू टिक पेड मॉडेलमध्ये बदल केले. युरोपियन युनियनला हा निर्णय धोकादायक वाटला. त्यांच्या मते, पैसे देऊन कोणीही ब्लू टिक घेऊ शकतो. त्यामुळे फसवणूक, स्कॅम आणि फेक अकाउंट्सचा धोका वाढतो. जाहिरातीत पारदर्शकता न दाखवणे आणि संशोधकांना पब्लिक डेटापासून दूर ठेवणे, हेही EUच्या DSA कायद्याचे उल्लंघन ठरले.
6 डिसेंबर 2025 रोजी EU ने Digital Services Act अंतर्गत पहिल्यांदाच एवढा मोठा दंड ठोठावला. युरोपियन युनियनने इलॉन मस्क यांच्या कंपनीवर 12 करोड युरो, म्हणजेच 12.59 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला.
अमेरिकेचा संताप (US Slams EU)
X कंपनीवर लावण्यात आलेला दंड पाहून अमेरिकेचे ट्रम्प सरकार युरोपियन युनियनवर चांगलेच भडकल्याचं दिसतंय. उपराष्ट्राध्यक्ष JD Vance यांनी EU वर आरोप केला की, 'ही आमच्या कंपन्यांवर आणि फ्री स्पीचवर अटॅक आहे.'
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री Marco Rubio म्हणाले की, 'हा फक्त X वरचा दंड नाही, तर सर्व अमेरिकन टेक कंपन्यांवर परकीय सरकारचा हल्ला आहे.'
EUचे स्पष्टीकरण, फसवणुकीपासून संरक्षण (EU’s Defence)
EUच्या टेक कमिशनर हेन्ना विर्कुनन यांनी सांगितले की, 'हा निर्णय ट्रान्सपेरन्सी आणि युजर प्रोटेक्शनसाठी आहे. यात सेंसरशिपचा प्रश्नच नाही.' ब्लू टिकची पेड प्रणाली लोकांना स्कॅम आणि बनावट खात्यांच्या जाळ्यात अडकवू शकते असं युरोपिनय युनियनने त्यांच्या अहवालात म्हटलं आहे.
डिजिटल नियमांवर महासत्ता भिडल्या (Global Digital Policy Clash)
हा वाद फक्त दंडाचा नाही, तर डिजिटल जगातील दोन वेगवेगळ्या विचारसरणींचा संघर्ष आहे.
अमेरिकेमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला सर्वाधिक महत्व दिलं जातं तर युरोपमध्ये राष्ट्रीय सुरक्षा आणि पारदर्शकतेला सर्वोच्च महत्व दिलं जातं. त्यामुळे मस्क यांच्या कंपनीवर लावण्यात आलेल्या दंडामुळे दोन्ही बाजूंमध्ये डिजिटल धोरणांवर मोठा तणाव निर्माण झाला आहे आणि पुढील काही महिन्यांत हा संघर्ष आणखी वाढू शकतो.
ही बातमी वाचा: