पेइचिंग : चीनच्या सिचुआन प्रांत भूकंपानं हादरला असून, भूकंपाची तीव्रता 6.6 रिश्टर स्केल मोजण्यात आली. या भूकंपात 100 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर हजारो नागरिक जखमी झाले आहेत. पण सरकारी आकडेवारीनुसार, मृतांची संख्या 5 असल्याचं सांगण्यात येत आहे.


सिचुआन प्रांताच्या वायव्य भागातील ग्वांगयुवानपासून पश्चिमेकडे 32 किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाच्या हदऱ्याने इमारतीचं मोठं नुकसान झालं आहे. सिचुआन सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 60 जण जखमी झाले आहेत. जखमींमधील 30 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

मृतांमध्ये सर्वाधिक संख्या पर्यटकांची आहे. मात्र यात परदेशी पर्यटकांची संख्या किती आहे. याची माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही.

दरम्यान,  हा संपूर्ण भाग भूकंप प्रवण असून, सिचुआन भूकंप प्रशासनाने सांगितलं की, भूकंपाचा केंद्रबिंदू नगावा जिल्ह्यात होता. या जिल्ह्यात तिबेटच्या रहिवाशांची संख्या जास्त आहे.