Pakistan Earthquake: पाकिस्तानमध्ये (Pakistan) रविवारची (29 जून 2025) सकाळ साऱ्यांना हादरवणारी ठरली आहे. कारण पाकिस्तानच्या काही भागात  5.3 तीव्रतेचा भूकंप (Earthquake in Pakistan) जाणवला आहे. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GFZ) नुसार, भूकंपाचे केंद्र जमिनीच्या आत 10 किलोमीटर खोलीवर होते. रॉयटर्सने युरो-मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटरच्या हवाल्याने म्हटले आहे की, भूकंपाचे केंद्र मुलतान शहरापासून 149 किमी पश्चिमेला होते. तर पहाटे 3.54 मिनिटांच्या (भारतीय वेळेनुसार)सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचे बोललं जात आहे. 

दरम्यान, या भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की लोक घराबाहेर पडले. किंबहुना भूकंपात कोणीही जखमी किंवा नुकसान झाल्याची अद्याप तरी कुठली माहिती समोर आली नाही. मात्र पुन्हा एकदा पाकिस्तानला भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. 

वारंवार भूकंप होण्यामागील कारण काय?

पाकिस्तान भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या सीमेवर असल्याने येथे वारंवार भूकंप होतात. भारतीय प्लेट दरवर्षी सुमारे 5 सेमी वेगाने उत्तरेकडे युरेशियन प्लेटमध्ये सरकत आहे.या टक्करमुळे भू-रचनात्मक ताण निर्माण होतो, जो वेळोवेळी भूकंपाच्या स्वरूपात जाणवतो. म्हणूनच पाकिस्तान, उत्तर भारत, नेपाळ आणि अफगाणिस्तानचे काही भाग भूकंपप्रवण क्षेत्र मानले जातात.

पाकिस्तानमधील भूकंपांचा इतिहास

भारताच्या शेजारील देश पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भूकंप होत आहेत, जे खूप धोकादायक मानलं जातं. उदाहरणार्थ, 2005 मध्ये मुझफ्फराबादमध्ये 7.6 तीव्रतेच्या भूकंपात 87, 000 लोक मृत्युमुखी पडले. 2007 मध्ये बलुचिस्तानमध्ये 7.7 तीव्रतेच्या भूकंपात 825 लोक मृत्युमुखी पडले.

भूकंपाच्या वेळी काय करावे?

भूकंपाच्या वेळी, एखाद्याने मजबूत टेबल किंवा डेस्कखाली लपले पाहिजे. भिंती, खिडक्या आणि विजेच्या तारांपासून दूर राहिले पाहिजे. जर कोणी बाहेर असेल तर मोकळ्या मैदानात गेले पाहिजे. लिफ्ट वापरणे टाळावे. भूकंपाच्या वेळी अफवा पसरवणे टाळावे. केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा.

टेक्टोनिक प्लेट्स धडकल्याने होतो भूकंप 

दरम्यान, पृथ्वी मोठ्या टेक्टोनिक प्लेट्सवर स्थित आहे. त्याखाली द्रवरूप लावा आहे. या प्लेट्स सतत तरंगत राहतात आणि कधीकधी एकमेकांशी आदळतात. टक्करीमुळे प्लेट्सचे कोपरे कधीकधी वाकतात आणि जेव्हा जास्त दाब असतो तेव्हा या प्लेट्स तुटू लागतात. अशा परिस्थितीत, खालून बाहेर येणारी ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आणि या गोंधळानंतर भूकंप होतो. जेव्हा टेक्टोनिक प्लेट्स पृथ्वीच्या आत अनेक मैल सरकतात तेव्हा शेकडो अणुबॉम्बइतकी ऊर्जा बाहेर पडते.

इतर महत्वाच्या बातम्या