अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी जाहीर केले की, ते तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी फेसबुक, ट्विटर आणि गूगलविरूद्ध खटला दाखल करणार आहेत. या कंपनीनी त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. वृत्तसंस्था एएफपीने ही बातमी दिली आहे.
न्यू जर्सी येथील बेडमिंस्टरमधील त्यांच्या गोल्फ क्लबमध्ये पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “आज अमेरिकेच्या फर्स्ट पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने मी फेसबुक, गुगल आणि ट्विटरसोबत या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग, सुंदर पिचाई आणि जॅक डोर्सी विरुद्ध खटला दाखल करीत आहे. तिघेही चांगले लोक आहेत."
ट्रम्प समर्थकांनी 6 जुलै रोजी अमेरिकन कॅपिटलवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन कारवाई करत त्यांची खाती निलंबित करण्यात आले होते. 75 वर्षीय रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, की देशातील सर्वोच्च तंत्रज्ञान संस्था "बेकायदेशीर, असंवैधानिक सेन्सॉरशिपच्या प्रवर्तक" बनल्या आहेत.