Sindh Interior Minister Zia ul Hassan Lanjar : पाकिस्तानमधील निदर्शकांनी सिंध प्रांतातील गृहमंत्री झियाउल हसन लंजर यांचे घर जाळले. निदर्शकांनी घराच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या रक्षकांनाही मारहाण केली. वृत्तानुसार, मंगळवारी सिंध प्रांतातील नौशेरो फिरोज जिल्ह्यात पोलिस आणि राष्ट्रवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये किमान दोन जणांचा मृत्यू झाला. अनेक लोक जखमी झाले आहेत. निदर्शकांनी सांगितले की सरकार त्यांची जमीन आणि पाणी काढून खाजगी कंपन्यांना देत आहे. निदर्शकांनी राष्ट्रीय महामार्गावर बसण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर केला.
निदर्शकांनी काही ट्रकही लुटले
यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी सिंध प्रांतातील गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला केला. निदर्शकांनी काही ट्रक लुटले आणि त्यातील तीन ट्रक पेटवून दिले, ज्यात एका तेल टँकरचाही समावेश आहे. चोलिस्तानमध्ये सिंचन व्यवस्था मजबूत करण्यासाठी पाकिस्तान सरकार सिंध नदीवर सहा कालवे बांधण्याची योजना आखत आहे. या मुद्द्यावरून पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) आणि शाहबाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) यांच्यातही तणाव वाढत आहे.
पाकिस्तानात आर्मी स्कूलवर आत्मघातकी हल्ला, 3 मुलांसह 5 जणांचा मृत्यू
दुसरीकडे, पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात रविवारी सकाळी आर्मी स्कूल बसवर आत्मघातकी हल्ला झाला. यामध्ये 3 मुलांसह 5 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 35 मुले जखमीही झाली आहेत. ही घटना खुजदार जिल्ह्यातील आहे. 40 मुले बसमधून सैनिक स्कूलला जात होती. त्यानंतर हल्ला करण्यात आला. पंतप्रधान शाहबाज आणि पाकिस्तानी सैन्याने या हल्ल्याचा निषेध केला. 2014 मध्ये पाकिस्तानातील पेशावरमधील एका मिलिटरी स्कूलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि 130 हून अधिक मुलांचा बळी घेतला. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने त्या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. आतापर्यंत बलुचिस्तानमध्ये या हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटले
दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी मंगळवारी बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली. डॉन न्यूजनुसार, चीनने मंगळवारी सांगितले की ते पाकिस्तानचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी पाकिस्तानला पाठिंबा देतात. वांग यी म्हणाले की चीन भारत आणि पाकिस्तानमधील चर्चेद्वारे वाद सोडवण्याच्या पुढाकाराचे स्वागत करतो. वांग यांनी पाकिस्तानला त्यांचे मजबूत मित्र म्हणून वर्णन केले. डार यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिल्याबद्दल वांग यांचे आभार मानले.
इतर महत्वाच्या बातम्या