Coronavirus Updates: जगातील 217  देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. आताही कोरोना रूग्णांच्या संख्येत विक्रमी स्तरावर वाढ होताना दिसत आहे. जगभरात गेल्या 24 तासांत 6 लाख 38 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर  9 हजार 593 लोकांचा यात मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात सामर्थ्यवान देश अमेरिकेत ही परिस्थिती अत्यंत वाईट होत चाचली आहे. अमेरिकेत दररोज दीड ते दोन लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे.

जगभरात जवळपास 13 लाख कोरोनाबाधितांचा मृत्यू

वर्ल्डोमीटर वेबसाइटनुसार, आतापर्यंत जगात 5 कोटी, 30 लाख 69 हजार कोरोनाबाधितांची नोंद केली गेली आहे. तर आतापर्यंत 12 लाख 98 हजार 493 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे या महामारीतून 3 कोटी 71 लाख लोक बरे झाले आहेत. सध्या 1 कोटी 45 ​​लाख रूग्णांवर उपचार सुरू असून त्यातील 95 हजार लोकांची प्रकृती गंभीर आहे.

दिवाळीतली मोठी गूड न्यूज! सिरम इन्स्टिट्युटची कोविशील्ड लसीची चाचणी अंतिम टप्प्यात | Covid Vaccine

कोणत्या देशात किती कोरोनाबाधित

कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झालेल्या देशांच्या यादीत अमेरिका अव्वल आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत 1 लाख 59 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यानंतर भारताचा नंबर येतो. भारतात 87 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.  गेल्या 24 तासांत 43 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. अमेरिका आणि भारतानंतर ब्राझीलमध्ये कोरोनाचा प्रभाव पाहायला मिळतो. ब्राझीलमध्ये 24 तासांत 34 हजार नवी प्रकरणे नोंदविली गेली आहे.

अमेरिका:  एकूण रुग्ण: 10,869,976, मृत्यू: 248,541

भारत:    एकूण रुग्ण: 8,727,900, मृत्यू: 128,686

ब्राझील:   एकूण रुग्ण: 5,783,647, मृत्यू: 164,332

फ्रान्स:     एकूण रुग्ण: 1,898,710, मृत्यू: 42,960

रूस:      एकूण रुग्ण: 1,858,568, मृत्यू: 32,032

स्पेन:     एकूण रुग्ण: 1,484,868, मृत्यू: 40,461

यूके:      एकूण रुग्ण: 1,290,195, मृत्यू: 50,928

अर्जेंटिना:  एकूण रुग्ण: 1,284,519, मृत्यू: 34,782

कोलंबिया: एकूण रुग्ण: 1,174,012, मृत्यू: 33,491

इटली:    एकूण रुग्ण: 1,066,401, मृत्यू: 43,589

दरम्यान जगातील संक्रमित लोकांमध्ये भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. इतकेच नाही तर मृत्यूच्या सर्वाधिक घटनांमध्ये भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे. तसेच,  जभरात सर्वात जास्त अ‍ॅक्टिव रुग्ण आढणारा भारत भारत चौथा देश आहे.