Coronavirus Updates : कोरोना महासाथीचा जोर ओसरत असल्याचे चित्र जगभरातील अनेक देशांमध्ये दिसत आहे. अशातच आता कोरोना महासाथीचा अंत झाला असल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ज्ञांकडून याबाबत चर्चा सुरू करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोना महासाथीची सुरुवात झाली होती. कोरोना महासाथ संपुष्टात आली आहे असे जाहीर केल्यास त्याचे काय परिणाम होतील यावरही चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे.
जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट होत आहे. कोरोना महासाथीचा अंत झाला आहे, हे समजण्यासाठी नेमके कोणते निकष, संकेत असावेत याबाबत जागतिक आरोग्य संघटनेत चर्चा सुरू आहे. कोरोना महासाथ संपुष्टात आल्याची घोषणा इतक्यात तरी होणार नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोना महासाथीची लाट संपुष्टात आल्याची घोषणा करण्याबाबत संबंधित समिती आवश्यक निकषांची पडताळणी करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चीनमध्ये वेगाने फैलावतोय कोरोना
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची साथ पसरली आहे. जवळपास दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच, रविवारी चीनमध्ये कोरोना संसर्गाची ३,३०० हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. अनेक शहरांमध्ये लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. शांघायमधील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. शेन्झेन शहरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.
हाँगकाँगमध्ये परिस्थिती बिकट
हाँगकाँगमध्ये कोरोनाबाबतची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. अधिकाऱ्यांनी कोविड-19 च्या 27,647 नवीन प्रकरणांची पुष्टी केली आहे. कोरोनामुळे 87 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 3,729 जणांनी प्राण गमावले आहेत. व्हिएतनाममध्ये कोरोनाची लाट आली आहे. एका आठवड्यात 14 लाख बाधित आढळले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
COVID-19 : चीनमध्ये पुन्हा कोरोना विस्फोट, एक कोटी 75 लाख लोकसंख्येच्या शहरात लॉकडाऊन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha