नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिला सबलीकरणासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान इंटरनॅशनल मॉनेटरी फंडच्या (IMF) मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथन यांनी सोमवारी सांगितले की कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारत आघाडीवर आहे. जगभरात आतापर्यंत 11 कोटी 77 लाख 23 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर भारतात आतापर्यंत एक कोटी 12 लाख 44 हजाराहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात 2 कोटी 9 लाख 89 हजार 10 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. 16 जानेवारीपासून भारतात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आहे.


भारताने अनेक देशांना लस पुरवली


गोपीनाथन यांनी म्हटलं की, कोरोना काळात लस तयार करणे आणि ती लस इतर देशांत पाठवण्यात भारताने अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याबद्दल भारतीची कौतुक करायला हवं. डॉ. हंसा मेहता व्याख्यानमालेदरम्यान गोपीनाथन बोलत होत्या. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने हे आयोजन करण्यात आले होते.


Coronavirus updates | आतापर्यंत देशात 2.26 कोटीपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लस


सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून लसीची सर्वाधिक डोसची निर्मिती


कोरोना लसीकरणच्या संदर्भात भारताने खरोखरच एक उल्लेखनीय काम केलं आहे. जगात कोरोना लस उत्पादक केंद्र कुठे आहे हे शोधलं तर ते भारतात आहे हे तुमच्या लक्षात येईल. गोपीनाथन यांनी पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे कौतुक केले. सीरम इन्स्टिट्युटने जगातील सर्वाधिक कोरोना लसीचे डोस तयार केले. त्यानंतर ही लस जगभरातील देशांमध्ये पुरवली गेली.


CoronaVirus | ठाण्यात पुन्हा हॉटस्पॉट मध्ये लॉकडाऊन! नागरिकांनी नियम पाळण्याचे आवाहन


Thane lockdown in Hotspot | ठाणे शहरातील 16 Hotspot क्षेत्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन