Corona Vaccine : एकीकडे संपूर्ण जग हे कोरोनावर मात करणाऱ्या लसीकडे डोळे लावून बसलं आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रियेसिस यांनी कोरोना लसीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. एखादी लस कोरोनाचा संसंर्ग रोखू शकत नाही, असं खळबळजनक वक्तव्य घेब्रियेसिस यांनी केलं आहे. एकीकडे युरोपिय देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे आतापर्यंत लाखो जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे अख्खं जग कोरोना लसीची वाट पाहत आहे. अशातच कोरोना लसीसंदर्भात डब्ल्यूएचओनं केलेल्या या मोठ्या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


कोरोनावरील लस स्वतः संसर्ग रोखू शकत नाही : डब्ल्यूएचओ


डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रियेसिस बोलताना म्हणाले की, कोरोनाची लस आल्यानंतर ते या कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवू शकणार नाही. टेड्रोस यांनी सोमवारी बोलताना सांगितलं की, लस आल्यानंतर ती करोनाशी लढण्यासाठी आपण वापरत असलेल्या इतर साधनांसोबत कोणतीही लस ही एक पूरक साधन म्हणूनच काम करेल. परंतु, ही लस त्यांची जागा घेऊ शकणार नाही.





पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ


डब्ल्यूएचओने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, यूएन हेल्थ एजंसीमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले 6,60,905 रुग्ण समोर आले आहेत. शुक्रवारी 6,45,410 कोरोना व्हायरसचे नवे रुग्ण समोर आले आणि त्यांनी 7 नोव्हेंबर रोजी समोर आलेल्या 6,14,013 रुग्णसंख्येला मागे टाकलं.


सुरुवातीच्या टप्प्यात यांना मिळणार वॅक्सिन


टेड्रोस यांनी सांगितलं की, वॅक्सिन येण्यापूर्वी सुरुवातीच्या दिवसांत याच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवलं जाईल आणि हेल्थ वर्कर्स, वयोवृद्ध माणसं आणि इतर अशा व्यक्ती ज्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. त्यांच्यापर्यंत वॅक्सिन पोहोचवण्यात येईल. त्यानंतर अशी अपेक्षा आहे की, कोरोनामुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येत घट होईल आणि आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यास मदत होईल.


कोरोनावरील लस आल्यानंतरी सावध राहणं गरजेचं : डब्ल्यूएचओ


दरम्यान, डब्ल्यूएचओनं यासोबतच इशाराही दिला आहे की, याव्यतिरिक्त कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढण्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण मिळेल. सर्विलांस जारी ठेवावं लागेल. लोकांनी सतत टेस्ट करत राहावं लागेल. त्यांनी आयसोलेशनमध्ये राहून काळजी घेण्याची गरज असेल. कॉन्टेक्ट ट्रेसिंगचीही गरजही आधीप्रमाणेच असेल. वैयक्तीक पातळीवर लोकांची काळजी घ्यावी लागेल.


महत्त्वाच्या बातम्या :