बीजिंग : चीनने शुक्रवारी दावा केला की कोरोना विषाणूचा संसर्ग गेल्या वर्षीच जगातील विविध भागात पसरला होता. मात्र, या संदर्भात पहिल्यांदा आम्हीच माहिती देत कारवाई केली.


कोविड -19 वुहानमधील जैव प्रयोगशाळेतून पसरल्याचा अमेरिकेचा आरोप देखली चीनने फेटाळून लावला. मानवाला लागण होण्यापूर्वी मध्यवर्ती चीनी शहरात वटवाघूळ किंवा पॅनगोलिनमधून याचा प्रसार झाल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला.


“कोरोना व्हायरस हा एक नवीन प्रकारचा विषाणू आहे, कारण अधिकाधिक तथ्य आणि अहवाल समोर येत आहेत,” अशी माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की गेल्या वर्षाच्या शेवटी जगभरातील विविध ठिकाणी महामारी (साथीचा रोग) पसरली होती. चीनने प्रथम साथीच्या रोगाची माहिती दिली आणि याची जीनोम साखळी जगाला सांगितली.


Coronavirus Vaccine | आनंदाची बातमी... वर्षाअखेरपर्यंत कोरोनावर प्रभावी लस तयार होण्याची शक्यता : WHO


चीनच्या सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टी (सीपीसी) ने या प्रकरणावर पडदा टाकल्याचा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी केला होता. यासंदर्भातही हुआने प्रतिक्रिया दिली आहे.


'जॉन्स हॉपकिन्स कोरोना व्हायरस रिसोर्स सेंटर' च्या मते, जगभरात 3 कोटी 60 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. दहा लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोविड 19 आजाराने अमेरिका हा जगातील सर्वात जास्त प्रभावित देश आहे. जेथे 76 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2,12,000 पेक्षा जास्त लोकांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला आहे.


चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे 90,736 लोक बाधित झाले. तर साथीमुळे 4,739 लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रवक्त्याने सांगितले की जानेवारी महिन्यात सीपीसी पॉलिट ब्युरोने साथीच्या रोगाबद्दल चर्चा केली होती. त्यानंतर यासंदर्भात 31 प्रांत आणि नगरपालिकांची बैठक बोलावली होती. ते म्हणाले, “चीनने वुहानमध्ये 23 जानेवारीला लॉकडाउन लावले होते. त्यावेळी चीनबाहेर कोरोना संक्रमितांची केवळ 9 केसेस होत्या. तर अमेरिकेत फक्त एक केस सापडली होती.


India VS China border dispute | चीनच्या कटाला भारतीय जवानांनी चोख उत्तर दिलं, लोकसभेत राजनाथ सिहांचं वक्तव्य