China Missile Test : चीनने (China) हायपरसॉनिक मिसाईल टेस्ट (Hypersonic Missile Test)केल्याचं समोर आलं आहे. चीनने ही चाचणी ऑगस्ट महिन्यातच केली होती पण आता त्याचा खुलासा झाला असल्याचं अमेरिकेच्या गुप्तचर खात्याच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. हायपरसॉनिक मिसाईल म्हणजे आवाजाच्या गतीहून अधिक वेगाने जाणारे आणि आपले लक्ष्य भेदण्यापूर्वी पृथ्वीची प्रदक्षिणा घालण्याची क्षमता असणारे अणवस्त्र होय. चीनचं हे मिसाईल त्याचं लक्ष्य भेदण्यास अपयशी झालं असून ते त्यापासून 24 मैल दूर गेलं. असं असलं तरी अमेरिकेने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षाही चीनने हायपरसॉनिक मिसाईलच्या विकासामध्ये मोठी प्रगती केली असल्याच स्पष्ट झालंय.  


महत्वाचं म्हणजे चीनने ही अणवस्त्र चाचणी अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकून केली आहे. चीनने केलेल्या या चाचणीचा अमेरिकन गुप्तचर खात्याला जराही अंदाज लावता आला नाही. चीनच्या वाढत्या लष्करी शक्तीला अमेरिकेने नेहमीच कमी लेखलं आहे. त्यामुळे आताची घटना ही अमेरिकेच्या गुप्तचर खात्याचं अपयश आहे असं मत अमेरिकेतल्या काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं. या चाचणीवरुन एक स्पष्ट होतंय की चीन आता त्याच्या शत्रूच्या संपूर्ण नुकसानीसाठी वेगवेगळ्या हत्यारांचा विकास करतोय. त्यामुळे अमेरिका, भारत आणि जगाच्या चिंतेत भर पडली आहे.


हायपरसॉनिक मिसाईल म्हणजे काय?
अमेरिका, चीन आणि रशिया हे देश हायपरसॉनिक मिसाईलचा विकास करत आहेत. हायपरसॉनिक मिसाईलचा वेग हा आवाजाच्या पाचपट पण बॅलेस्टिक मिसाईलपेक्षा कमी असतो. पण बॅलेस्टिक मिसाईलप्रमाणे ते ठराविक पॅराबोलिक पद्धतीने फिरत नाही. त्यामुळे त्याला ट्रॅक करणे थोडं अवघड जातं.


महत्वाच्या बातम्या :