ट्रकखाली भरधाव कार घुसली, थरार कॅमेऱ्यात कैद
एबीपी माझा वेब टीम | 21 Aug 2016 04:55 AM (IST)
नवी दिल्लीः सिग्नल तोडण्याच्या प्रयत्नात असलेली भरधाव कार ट्रकखाली घुसण्याची थरारक घटना चीनमध्ये घडली. चीनच्या जीयांगसू प्रांतातील ही घटना आहे. हा भीषण अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अपघातात कार चालकाला किरकोळ जखम झाली आहे. मात्र अपघातात दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. कार चालकाला वेगावर नियंत्रण मिळवता न आल्यामुळे हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. लाल सिग्नल दिसत असतानाही कार चालकाने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला.