China Support India On Tariff: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. भारतावर अतिरिक्त 25 टक्के कर (Donald Trump Tariff On India) लादण्याच्या कार्यकारी आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. ही करवाढ 21 दिवसांनंतर म्हणजेच 27 ऑगस्टपासून लागू होईल. रशियाकडून तेल खरेदीमुळे भारतावर ही कारवाई करण्यात आल्याचं आदेशात म्हटलंय. 25 टक्के अतिरिक्त करामुळे अमेरिकेचा भारतावर एकूण आयातकर 50 टक्के झाला आहे. दरम्यान, टॅरिफ वॉरला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर चीन चक्क भारताच्या बाजूनं असल्याचं दिसत आहे. व्यापार धोरणांचा गैरवापर होत असल्याची टीका चीनने अमेरिकेवर केली आहे. 

Continues below advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर चीन भारताच्या बाजूनं- 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा पाकिस्तानचा सच्चा मित्र म्हणून ओळखला जाणाऱ्या चीनकडून विरोध करण्यात आला आहे. अमेरिकेने भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावल्यानंतर चीनची भूमिका समोर आली. टॅरिफ धोरणाच्या दुरूपयोगाला स्पष्ट विरोध असल्याची प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकून यांनी दिली. दरम्यान चीनच्या या भूमिकेवर अमेरिका काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

रशियाचे अध्यक्ष पुतिन लवकरच भारत दौऱ्यावर-

रशियाचे अध्यक्ष पुतिन लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी याबद्दल माहिती दिली आहे. पुतिन यांचा हा दौरा 2025 च्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर या दौऱ्याला अधिकच महत्त्व प्राप्त झाल्याची चर्चा आहे.

Continues below advertisement

'भारतीय सामान, मेरा स्वाभिमान' मोहिम सुरु-

ट्रम्प प्रशासनाने भारतावर व्यापारिक शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अमेरिकेसोबत व्यापार करताना भारतीय व्यापाऱ्यांची कोंडी होणार आहे. त्यामुळे  CAIT या व्यापारांच्या भारतातील अत्यंत मोठ्या संघटनेने अमेरिकेला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सामान, मेरा स्वाभिमान, ही मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत कॅटशी देशभरात जोडलेल्या 40 हजार व्यापारी संघटना आणि 8 कोटी व्यापारांच्या माध्यमातून स्वदेशी वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठीची खास मोहीम राबवली जाणार आहे.

भारताचं डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर-

भारत सरकारने रशियाचंच उदाहरण देत ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिलं होतं. ज्या रशियाचं नाव घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकावलं आहे, त्याच रशियाकडून अमेरिका व युरोपियन युनियन कच्चा माल आयात करत असल्याचा दाखला भारतानं दिला आहे.युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका व युरोपियन राष्ट्रे रशियाकडून तेल आयात करतो म्हणून भारतावर सातत्याने टीका करत आहेत. पण युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून तेलाचे उपलब्ध पुरवठा पर्याय हे युरोपकडे वळवण्यात आले. त्यामुळेच भारतानं रशियाकडून तेल आयात करायला सुरुवात केली, असं भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित बातमी:

Narendra Modi On Donald Trump Tarrif: अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादला; नरेंद्र मोदींकडून डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव न घेता प्रत्युत्तर, म्हणाले, आमच्यासाठी...