बीजिंग : चीनचं Change 5 मिशन चंद्रावर यशस्वीरित्या लँड करण्यात आलं आहे. दरम्यान, चार दशकांमध्ये पहिल्यांदाच चंद्रावरून साहित्य परत आणण्यासाठी पहिल्यांदाच मिशन लॉन्च करण्यात आलं आहे. 2013 पासून आतापर्यंत तिसऱ्यांदा चीनने चंद्राच्या भूमीवर एक रोबोटिक अंतराळ यान उतरवलं आहे.
चीनच्या सरकारी माध्यमांनी यासंदर्भात माहिती दिली. चीनने दिलेल्या माहितीनुसार, चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळयान यशस्वीरित्या उतरवण्यात आलं आहे. हे यान चंद्राच्या पृष्ठभागावरील काही नमूने एकत्र करणार आहे.
सोमवारी दुपारी 3 वाजून 31 मिनिटांनी चीनने चंद्रावर पाठवण्यासाठी आणखी एक मिशन लॉन्च केलं होतं. चीनच्या इतिहासात पहिल्यांदाच चंद्राच्या पृष्ठभागावरून नमूने एकत्र करण्यासाठी चांग’-5 (Chang'e-5) नावाचं मिशन लॉन्च केलं. याचा उद्देश चंद्रावरील नमूने गोळा करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर रोबोट उतरवणं हे आहे. हे अंतराळयान नमूने गोळा केल्यानंतर पृथ्वीवर परतणार आहे. चंद्रावर अभ्यास करण्यासाठी चीनचं हे तिसरं मिशन आहे.
काय आहे उद्देश?
चांग’-5 अंतराळयानाचा उद्देश पहिल्यापासून अस्पष्टिकृत क्षेत्रातून चंद्रावरील दगड आणि धूळ, मातीचे 4 पाऊंड एकत्र करणं आहे. एक ज्वालामुखीय मैदान ज्याला मॉन्स रुमर म्हटलं जातं. या नमुन्यांमार्फत चंद्रावरील मागील ज्वालामुखींबाबत नवी माहिती मिळू शकते. चीनचं हे मिशन जर यशस्वी झालं, तर चीन अमेरिका आणि सोविएत संघांनंतर मून-रॉकचे नमूने पृथ्वीवर आणणारा तिसरा देश ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :