बँकॉक : सौदी अरेबियानं चीनला अवघ्या 28 धावांत गुंडाळून, जागतिक क्रिकेट लीगच्या विभागीय पात्रता सामन्यात तब्बल 309 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासात चीनच्या 28 धावा हा नीचांक ठरला आहे.


या सामन्यात सौदी अरेबियानं 50 षटकांत 418 धावांचा डोंगर रचला होता. त्यानंतर चीनच्या फलंदाजांनी सौदी अरेबियाच्या आक्रमणासमोर सपशेल लोटांगण घातलं. चीनचा अख्खा डाव 12.3 षटकांत अवघ्या 28 धावांत गडगडला. या सामन्यांचं बँकॉकमध्ये आयोजन करण्यात आलं आहे.

याआधी 2004 साली श्रीलंकेनं झिम्बाब्वेला 35 धावांत गुंडाळलं होतं. वन डे क्रिकेटच्या इतिहासातला 18 धावांचा नीचांक हा वेस्ट इंडिजच्या 19 वर्षांखालील संघाच्या नावावर आहे. गयानात बार्बाडोसविरुद्धच्या सामन्यात विंडीजच्या युवा संघाचा डाव 18 धावांत आटोपला होता.