सीरिया : सीरियामध्ये रासायनिक शस्त्रांचा हल्ला झाला असून, या हल्ल्यात 40 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सीरियन टीव्ही मीडियाच्या वृत्तांनुसार, सोमवारी लष्करी विमानतळाच्या टर्मिनल-4 एअरफिल्डमध्ये जबरदस्त तीव्रतीचे स्फोट झाले.

बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या घौटा भागातील या हल्ल्यात रासायनिक अस्त्रांचा वापर झाल्याचा आरोप होतो आहे. या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र संघानेही निषेध केला आहे.

हल्ल्यात क्लोरिन गॅसचा वापर झाल्याची शंका जगभरातून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सीरियातील सरकारी माध्यमांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

दरम्यान, या हल्ल्याचा निषेध करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावर कारवाई करण्याचे संकेत दिलेत. तसेच, रशियाचे पंतप्रधान पुतीन यांनाही या हल्ल्यासाठी ट्रम्प यांनी जबाबदार धरले आहे.

ट्रम्प नेमकं काय म्हणाले?