Princess Diana Car Update : प्रिन्सेस ऑफ वेल्स आणि ब्रिटनचे भावी सम्राट प्रिन्स विल्यम यांची दिवंगत आई डायनाच्या फोर्ड एस्कॉर्ट कार तब्बल 50 हजार पाऊंडला विकली गेली आहे. अमेरिकी डॉलरशी तुलना केली तर ही कार 69,200 डॉलर आणि भारतीय रुपयामध्ये ही कार 1,25,87,718 कोटी रुपयांना विकली आहे. प्रिन्सेस ऑफ वेल्सला Silver 1.6L Ghia saloon ही कार प्रिंस चार्ल्सने लग्नाच्या अगोदर दोन महिने झालेल्या साखरपुड्यात भेट दिली होती. प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांचा शाही लग्न सोहळा 1981 साली लंडनच्या सेंट कॅथड्रल येथे झाली होता. डायनाची ही कार दक्षिण अमेरिकेच्या संग्राहलयाने खरेदी केली आहे.
1982 साली पहिल्यांदा झाला होता कारचा लिलाव
या कारचा लिलाव पहिल्यांदा 1982 साली झाला होता. लिलावात एका अँटिक डीलरने ही कार 6000 पाऊंडमध्ये खरेदी केली होती. त्यानंतर ही कार एका कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलेने 52,640 पौंडमध्ये खरेदी केली होती. दक्षिण इंग्लंडमधील Reeman Dansie Auctionsच्या लूईस रोबर्ट (Lewis Rabett) ने सांगितले की, या कारच्या लिलावात दक्षिण अमेरिकाच्या संग्रहालयाने सर्वात जास्त बोली लावली होती. लिलावाच्या अगोदर ही कार खरेदी करण्यासाठी अनेकजण उत्सुक होते. अमेरिकेच्या संग्रहालयाने कार खरेदी केल्यानंतर या कारची जागतिक स्तरावर पसंदी वाढेल.
कारला अजूनही ब्रिटिश नंबर प्लेट
डायनाच्या या कारमध्ये आता देखील ब्रिटिश नंबर प्लेट आहे. या कारचा नंबर WEV 297W आहे. कारच्या स्पीडोमीटरमध्ये 1,33,575 किलोमीटर धावली आहे. हे कार 30 ते 40 हजार पौंडला विकण्याची शक्यता होती परंतु ही त्यापेक्षा जास्त किंमतीला विकली गेली. डायनाचा मृत्यू 1997 साली एका कार अपघातात झाला होता. पापाराजीपासून वाचण्यासाठी डायनाची भरधाव वेगाने चालली होती, त्यावेळी ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटला आणि अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्या वेळी डायनाचे वय 36 वर्ष होते. गुरुवारी प्रिन्स डायनाचे दोन मुलं प्रिन्स विलियम आणि प्रिन्स हॅरीने लंडनच्या किंग्सटन पॅलेसमध्ये एका मूर्तीचे अनावरण केले. डायनाची 60 वी जयंती होती.