Justin Trudeau Resignation: भारताबाबत संघर्षाची भूमिका घेणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी पंतप्रधान पदाचा आणि लिबरल पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅनडात मोठी उलथापालथ झाली आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये पहिल्यांदा कॅनडाचे पंतप्रधान झाल्यानंतर गेली सलग नऊ वर्ष ते कॅनडाच्या पंतप्रधान पदावर होते. जोपर्यंत लिबरल पार्टी ऑफ कॅनडा हा ट्रुडूंचा पक्ष पुढील नेत्याची निवड करत नाही तोपर्यंत पंतप्रधानपदावर ते कायम राहतील. पक्षांतर्गत असंतोष, कमी झालेली लोकप्रियता, बिघडलेले राजकीय संबंध, ट्रम्प यांची धमकी, अशा अनेक कारणांमुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागल्याचं सांगितलं जातंय. काय कारण आहेत, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या राजीनाम्याची? पाहूया सविस्तर.
1. पक्ष आणि मित्रपक्षांचा विरोध
- पोल ट्रॅकरनुसार जेव्हा ते पंतप्रधान झाले तेव्हा त्यांची लोकप्रियता 68 टक्के होती जी आज 28 टक्क्यांवर आलीय. अशात ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभव होईल या भीतीनेच पक्षातूनच विरोध वाढला होता.
-एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी ट्रुडो यांना थेट गव्हर्नर ऑफ कॅनडा असं म्हणत कॅनडाला अमेरिकेचं 51 चं राज्य आहे अशी खिल्लीही उडवली.. तेव्हा तिथं ट्रुडो यांनी आक्रमकता दाखवली नाही, म्हणूनही देशात प्रचंड नाराजी होती.
- ट्रम्प यांच्यासोबत कारभार करणं कठीण असल्याचं सांगत त्यांच्या मंत्रिमंडळातून उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री असलेल्या क्रिस्टिया फ्रिलॅंड यांच्यासह अनेकांचे राजीनामे
2.मित्र जगमीत यांची खुली धमकी!
- ट्रुडो यांचं सरकार आधीच अल्पमतात होतं. 2019 साली त्यांच्या लिबरल पार्टीला 157 जागांवर विजय मिळाला आहे. 338 खासदारांच्या कॅनेडियन संसदेत 170 बहुमताचा आकडा आहे जो आकडा गाठण्यात त्यांना १३ जागा कमी पडल्या होत्या... मात्र तरीही सर्वात मोठा पक्ष असल्यानं अल्पमतातलं सरकार स्थापनेची संधी होती... त्यावेळी त्यांनी जगमीत सिंग यांच्या न्यू डेमोक्रेटिक पक्षाचा पाठिंबा मिळवला आणि स्थीर सरकार दिलं.. पण काही दिवसांपूर्वीच जगमीत यांनी भर सभेत ट्रुडो सरकारविरोधात अविश्वास ठराव आणणार अशी घोषणा केली... त्याचाही दबाव आजच्या राजीनामाला कारणीभूत ठरला.
3. ट्रम्प आणि त्यांची धमकी
- वाढतं कॅनडीयन स्थलांतर आणि ड्रग्ज तस्करीविरोधात नवं ट्रम्प प्रशासन आक्रमक भूमिका घेईल असं आधीच जाहीर केलं होतं.. त्यात अगदी आजही ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर ट्रम्प यांनी कॅनडाचा उल्लेख अमेरिकेचं 51वं राज्य असाच केलाय. दुसरीकडे ट्रम्प प्रशासनानं शपथविधी आधीच 25 टक्के आयात शुल्क वाढीची धमकी दिलीय... एका अहवालानुसार कॅनडाच्या एकूण निर्यातीचा विचार केला तर 75 टक्के निर्यात फक्त अमेरिकेत होते.. अशावेळी अमेरिकने प्रतिशत टैरिफ़ (आयात शुल्क) वाढवलं तर त्याचा थेट कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसेल!
-देशाची अर्थव्यवस्था धोक्यात येईल आणि ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर संबंध आणखी ताणले जातील असं म्हणत कॅनडाच्या अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान क्रिस्टिया फ्रीलॅंड यांनी राजीनामा दिला होता... त्यामुळे ट्रुडो यांच्या सरकारला मोठा धक्का बसला होता.
-मेक्सिको आणि कॅनडाच्या सीमा सुरक्षा बाबतीत ट्रम्प यांची कठोर भूमिका कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करु शकते
4. मोदी सरकारवर गंभीर आरोप आणि भारताशी ताणलेले संबंध
-प्रो खलिस्तानी हरदीपसिंग निज्जर हत्येप्रकरणी सप्टेंबर २०२४ला ट्रुडो यांनी भारतावर गंभीरपणे आरोप केले.. तेव्हापासून आपले कॅनडाशी संबंध खराब झालेत
-अगदी मोदींच्या भेटीनंतरही संबंध सुधारले नव्हते.
ट्रुडो नंतर कोण?
•टोरंटोच्या खासदार आणि ट्रुडो सरकामध्ये उपपंतप्रधान राहिलेल्या क्रिस्टिया फ्रीलॅंड यांचं नाव आघाडीवर आहे
•शिवाय सध्याचे अर्थमंत्री डॉमिनिक लेब्लँक यांचंही नाव पुढे आहे!
• दुसरा क्रमांक आर्थिक सल्लागार आणि बॅंकर मार्क कार्नी यांचा, त्यांच्या नावाला ट्रुडो यांचीही पसंती आहे!
• तिसऱ्या क्रमांकावर कॅनडाच्या पहिल्या हिंदू महिला खासदार आणि सध्याच्या दळबमंत्री अनिता आनंद यांचं नाव आहे... त्या कॅनडातील प्रसिद्ध वकील आहेत. त्यांनी संरक्षण मंत्री म्हणूनकाम केलंयं साठच्या दशकात अनिता आनंद यांचे आईवडील कॅनडात स्थलांतरित झाले होते.
• चौथं आणि शेवटचं नाव सध्याच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जोली (melanie joly) आहेत.. ही नावं सध्या बीबीसी आणि इतर अमेरिकन न्यूज चॅनल्सवर चालत आहेत..
हेही वाचा: