Canada Plane Crash : कॅनडामध्ये विमान कोसळून (Plane Crash) अपघात घडला असून यामध्ये दोन भारतीयांसह (Indians) तिघांचा मृत्यू झाला आहे. या विमानात दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह (Trainee Pilot) तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान परिसरातील एका झाडावर आदळल्यानंतर अपघात झाला. कॅनडातील वँकूवरजवळील चिल्लीवॅक येथे हे विमान (Light Aircraft) दुघर्टनाग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. या विमानामध्ये दोन भारतीय शिकाऊ पायलट होते, त्यांचा या अपघातात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.


दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह तिघांचा मृत्यू


स्नानिक मीडिया रिपोर्टनुसार, विमान एका झाडावर आदळल्यने हा अपघात झाला. त्यानंतर हे दुर्घटनाग्रस्त विमान हॉटेल इमारतीच्या मागे कोसळलं. या दुर्घटनेत दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा दुर्दैवी अंत झाला असून त्यांची नावे अभय गडरू आणि यश विजय रामुगाडे अशी आहेत. हे दोन्ही भारतीय मुंबई येथील रहिवासी होती. स्थानिक प्रशासन घटनास्थली पोहोचलं असून यासंदर्भात अधिक तपास सुरु आहे. 






पायपर पीए-34 सेनेका हे दुहेरी इंजिन असलेले हलके विमान चिलीवॅक शहरातील मोटेलच्या मागील झाडांवर आदळून हा अपघात झाला, अशी माहिती कॅनडाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेत दोन भारतीय नागरिकांशिवाय आणखी एका वैमानिकाचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.


 






छोट्या ट्विन-इंजिन विमानाचा अपघात


कॅनडा पोलिसांनी एका निवेदनात या दुर्घटनेसंदर्भात माहिती देताना म्हटलं आहे की, 'घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे आणि या परिसरात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पाईपर पीए-34 सेनेका नावाच्या छोट्या ट्विन-इंजिन विमानाचा हा अपघात झाला. अहवालानुसार, पाइपर PA-34 विमानाची निर्मिती 1972 मध्ये झाली आणि 2019 मध्ये नोंदणी झाली.


कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु


याबाबतची माहिती मृतांच्या कुटुंबीयांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कॅनडाच्या वाहतूक सुरक्षा मंडळाने सखोल तपासासाठी घटनास्थळी पथक पाठवलं आहे.