Britain Covid19 Update : जगात कोरोना (Corona) आणि ओमायक्रॉन व्हेरियंटचा (Omicron Variant) संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान प्रवासांवर निर्बंध घातले आहेत. अनेक देशांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे निर्बंध लावले आहेत. अशात आता ब्रिटन सरकार आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांवरील (International Passanger) निर्बंध हटवताना दिसत आहे. ब्रिटनमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून पूर्णपणे लसीकरण झालेल्या प्रवाशांसाठी कोरोना चाचण्या आवश्यक नसतील. ब्रिटनचे परिवहन मंत्री ग्रँट शॅप्स ही माहिती दिली आहे.


यूके सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी प्रवासाआधीच्या कोरोना चाचणीचे निर्बंध हटवले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासी आगमनानंतर सेल्फ-आयसोलेशन वगळू शकतात. पूर्वी, निगेटिव्ह-पीसीआर अहवाल येईपर्यंत आगमनानंतर स्वत: ला अलग ठेवणे बंधनकारक होते. यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी संसदेला संबोधित करून वरील नव्या नियमावलीची घोषणा केली आहे. भारतीय प्रवासी देखील या सूट अंतर्गत येतील.


पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जाहीर केले की लसीकरण पूर्ण झालेल्या इंग्लंडमध्ये येणाऱ्या प्रवाशांना यापुढे कोविड चाचणी करणे आवश्यक नसेल. प्रवाशांना निगेटिव्ह अहवाल येईपर्यंत स्वत: ला विलगीकृत ठेवण्याची आवश्यकता देखील नसेल. त्याऐवजी आता प्रवाशांना दोन दिवसात फ्लो टेस्ट करणे आवश्यक असेल. नवी कोरोना नियमावली 26 जानेवारीपासून लागू होण्याची शक्यता आहे. काही दिवसांत या संदर्भात घोषणा होईल. दुकाने आणि सार्वजनिक वाहतूक यांसारख्या ठिकाणी मास्क घालण्याचे निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha