4 वर्षांच्या चिमुरड्याचं डोकं मसाज टेबलमध्ये अडकलं
एबीपी माझा वेब टीम | 04 Aug 2017 01:21 PM (IST)
चार वर्षांचा चिमुकला आईसोबत स्पामध्ये गेला. आईची नक्कल करण्याच्या नादात मसाज टेबलच्या फेसहोलमध्ये त्याने डोकं घातलं. मात्र त्यातच त्याचं डोकं अडकलं.
बीजिंग : स्पामध्ये चिमुकल्यांना सोबत घेऊन जाणाऱ्या पालकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे. चीनमध्ये झेजियांग प्रांतात मसाज टेबलमध्ये एका चिमुकल्याचं डोकं अडकलं होतं. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर या चिमुरड्याची सुटका करण्यात आली. चीनमध्ये चार वर्षांचा चिमुकला आईसोबत स्पामध्ये गेला. आईची नक्कल करण्याच्या नादात मसाज टेबलच्या फेसहोलमध्ये त्याने डोकं घातलं. मात्र त्यातच त्याचं डोकं अडकलं. मसाज पार्लरमधील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करुनही काहीच फरक पडला नाही. त्यामुळे स्थानिक अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. मुलाच्या मानेभोवतीचा भाग काढल्यानंतर मोठ्या प्रयत्नांनी त्याचं डोकं मसाज टेबलच्या फेसहोलमधून सुखरुप बाहेर काढलं. हा सर्व प्रकार सुरु असताना चिमुकला अजिबात पॅनिक झाला नाही आणि त्याने पूर्ण सहकार्य केल्याचंही अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. पाहा व्हिडिओ :