Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक धोरण राबवत पाकिस्तानची कोंडी केली आहे. भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू जलकरार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर पाकिस्तानाचे माजी विदेश मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताला धमकी देत सिंधू नदीत आमचं पाणी वाहताना दिसेल नाही तर तिथं त्यांचं रक्त वाहील, असं म्हटलं होतं. भारताचा कारवाईचा धडाका पाहता बिलावल भुट्टो यांच्या चेहऱ्यावरील भीती स्पष्टपणे दिसू लागली आहे. बिलावल भुट्टो यांनी पाकिस्तान भारतासोबत शांततेसाठी तयार असल्याचं म्हटलं.  

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे चेअरमन बिलावल भुट्टो यांनी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये बोलताना म्हटलं की जर भारत शांततेच्या मार्गावर चालत असेल त्यांनी खुल्या हातानं यायला हवं मूठ बंद करुन त्यांनी येऊ नये. त्यांनी पुराव्यासह समोर यावं, कोणत्याही रचलेल्या गोष्टींसह येऊ नये. आपण शेजारी असल्यासारखं बसून बोलू असं बिलावल भुट्टो म्हणाले.  

दहशतवादामुळं पीडित असल्याचं वक्तव्य

बिलावल भुट्टो यांनी दावा केला की पाकिस्तानचा पहलगामच्या हल्ल्यात दावा नाही पुढं ते म्हणाले पाकिस्तान दहशतवादाचा पीडित आहे. पाकिस्ताननं दहशतवादी हल्ल्यात मारले गेलेल्या सैनिकांना आणि शाळकरी मुलांना पाहिलं आहे. दहशतवाद आमच्यापेक्षा अधिक कुणी सहन केला नाही, असं ते म्हणाले.  बिलावल भुट्टोंनी दहशतवादाचा सामना फक्त शस्त्रांनी करता येणार नाही तर  विचार, शिक्षण, आर्थिक सुधारणा आणि एकतेनं लढावं लागेल,असं म्हटलं.  

भारताचं आक्रमक धोरण

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक भूमिका घेतली आहे. भारतानं पाकिस्तान विरुद्ध मोठे निर्णय घेतले. भारतानं सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे सिंधू जल करार स्थगित केला आहे. भारतानं पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा रद्द केले आहेत. पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबवला आहे. पाकिस्तानातून येणाऱ्या आयातीवर बंदी घातली आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांना यूट्यूबवरुन ब्लॉक करण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या कलाकार आणि खेळाडूंच्या यूट्यूब चॅनेल्सला बॅन करण्यात आलं आहे. याशिवाय पाकिस्तानच्या काही खेळाडूंची इन्स्टाग्राम खाती देखील बंद झाली आहेत. 

तुम लढो... हम कपडे संभालते है! वरवर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या चीनचा UN सुरक्षा परिषदेत चकार शब्दही नाही, चीनची अशीही फसवाफसवी