बेरुत : लेबनानची राजधानी बेरुतमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात अनेक लोक जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे राजधानी शहरातील अनेक भाग हादरले. शहरात काळ्या धुराचे लोट दिसत होते. काही स्थानिक न्यूज चॅनलच्या माहितीनुसार, बेरुतमधील पत्तनच्या त्या परिसरात स्फोट झाले जेथे फटाके ठेवले जात होते.
बेरुतच्या पत्तनजवळ हा स्फोट झाला. घटने मोठं नुकासानही झालं आहे. घटनेनंतर काही व्हिडीओ समोर आले, त्यामध्ये गाड्या आणि इमारतींना आग लागल्याचं दिसून येत आहे. धूर हळूहळू सर्वत्र पसरत आहेत आणि अचानक स्फोट होत असल्याचंही दिसून येत आहे.