पहिल्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बराक ओबामा शपथविधी आधी हवाई बेटांवर आले होते. या सुट्टीदरम्यान ओबामांनी सर्फिंगचा आनंद लुटला होता. "परंतु तुम्ही शेवटचं सर्फिंग करत आहात. पुढील आठ वर्ष तुम्हा ना सर्फिंग करता येणार ना वॉटरस्पोर्ट्स," असं त्यांच्या नव्या सिक्युरिटी टीमने बजावलं होतं.
आता अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर बराक ओबामा सुट्टीचा मनमुराद आनंत घेत आहेत. व्हाईट हाऊस सोडल्यानंतर ओबामांनी पहिल्यांदा कॅलिफोर्नियाच्या पाल्म स्प्रिंगमध्ये काही दिवस घालवले होते.
सध्या बराक आणि मिशेल ओबामा व्हर्जिन ब्रिटीश आयलंडवर सुट्टीची मज्जा घेत आहेत. यावेळी ओबामांनी काईट सर्फिंग केलं. विशेष म्हणजे काईट सर्फिंगमध्ये ओबामांनी ब्रॅनसन यांनाही मागे टाकलं.
पाहा व्हिडीओ