बीजिंग: नोकरी करताना चांगलं काम केलं नाही तर तुम्हाला बऱ्याचदा बॉसची नाराजी सहन करावी लागते. पण चीनमध्ये बँक कर्माचाऱ्यांना त्यांच्या खराब कामगिरीबद्दल अशी काही शिक्षा देण्यात आली आहे की, ज्यानं चीनमध्ये बरंच वादळ उठलं आहे.

 

चीनच्या एका बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग सेशन आयोजित केलं होतं. मात्र, ट्रेनिंगनंतर 'टीम बिल्डिंग वर्कशॉप'मध्ये खराब परफॉर्मन्स देणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना चक्क पार्श्वभागावर फटके देण्यात आले.

 

तब्बल 8 कर्माचाऱ्यांना स्टेजवर बोलवून सगळ्यांसमोर अशी मारहाण करण्यात आली आहे. या आठ कर्मचाऱ्यांमध्ये 4 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश होता.

 

मात्र, हा सर्व प्रकार सुरु असतानाच एका कर्मचाऱ्यानं याचं शुटींग केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला. आतापर्यंत 3 लाख जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

 

बँक मॅनेजरनं चक्क पट्टीने या आठही जणांना झोडपून काढलं आहे. यावेळी हा मार असह्य झाल्यानं एक महिला कर्मचारी जवळजवळ कोलमडलीच मात्र, निर्दयी मॅनेजरला याचा काहीही फरक पडला नाही. त्यानं मारणं सुरुच ठेवलं.

 

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या बँकेवर बरीच टीका करण्यात आली. अशाप्रकारे मारहाण केल्याप्रकरणी मॅनेजरला निलंबित करण्यात आलं आहे.

 

VIDEO: