Lebanon Migrant Boat : लेबनॉनमधून स्थलांतरित आणि निर्वासितांना घेऊन जाणारी बोट सीरियाच्या किनारपट्टीवर उलटल्याने तब्बल 61 जणांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉनचे परिवहन मंत्र्यांनी आज याबाबत माहिती दिली. दरम्यान, सीरियन सरकारने यापूर्वी सांगितले होते, की टार्टोसमधील बासेल रुग्णालयात वाचलेल्या 20 जणांवर उपचार सुरू आहेत. सुटका करण्यात आलेल्या लोकांमध्ये दोन गर्भवती महिला आणि दोन मुलांचा समावेश असल्याचे त्यात म्हटले आहे.
सीरियाच्या वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी लेबनॉनच्या उत्तर मिन्येह प्रदेशातून 120 ते 150 च्या लोकांसह निघाली होती. सीरियन बंदरांचे महासंचालक समेर कुब्रुस्ली यांनी सांगितले की, शुक्रवारी शोध मोहीम सुरू होती. समुद्रातील खराब वातावरणामुळे तसेच जोरदार वाऱ्याने बचावकार्य कठीण झाले होते, असे त्यांनी यापूर्वी सांगितले होते.
लेबनॉन आर्थिक मंदीच्या गर्तेत, जीव धोक्यात घालून स्थलांतर सुरु
लेबनीज, सीरियन आणि पॅलेस्टिनींनी संकटग्रस्त लेबनॉनमधून समुद्रमार्गे युरोपला पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने ही भयंकर घटन घडली आहे. एकट्या लेबनॉनमध्ये हजारो लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत आणि लेबनीज पाउंडने त्याचे मूल्य 90 टक्क्यांहून अधिक घसरले आहे, ज्यामुळे हजारो कुटुंबे संकटात आल्याने अत्यंत गरीबीत जगत आहेत.
दरम्यान, टार्टसचे गव्हर्नर अब्दुलहलीम खलील यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन या गंभीर दुर्घटनेतून वाचलेल्यांची भेट घेतली. जहाजात किती लोक होते आणि ते नेमके कोठे जात होते हे स्पष्ट झालेलं नाही, परंतु कोस्टगार्ड अजूनही मृतदेह शोधत आहे.सरकारी प्रसारमाध्यमांनी सांगितले की, या बोटीत वेगवेगळ्या देशांमधील लोक होते. युरोपमध्ये संधी शोधण्यासाठी गेल्या काही महिन्यांत हजारो लेबनीज, सीरियन आणि पॅलेस्टिनींनी बोटीतून लेबनॉन सोडले आहे.
बोट दुर्घटना, वर्षातील दुसरी घटना
लेबनॉनची लोकसंख्या साठ लाख आहे. ज्यामध्ये 10 लाख सीरियन निर्वासितांचा समावेश आहे. 2019 च्या उत्तरार्धापासून गंभीर आर्थिक मंदीच्या गर्तेत आहे. ज्यामुळे तीन चतुर्थांश लोकसंख्या दारिद्र्यात खेचली गेली आहे. एप्रिलमध्ये, डझनभर लेबनीज, सीरियन आणि पॅलेस्टिनींना समुद्रमार्गे इटलीला स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करणारी एक बोट दुर्घटनाग्रस्त झाली होती. या घटनेत डझनभर ठार झाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या