रियाध (सौदी अरेबिया) : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान सौदी अरेबियाची (Saudi Arabia) राजधानी रियाधमध्ये (Arab-Islamic Summit) अरब नेते आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष यांच्या बैठकीत गाझामधील हमासविरुद्धच्या युद्धात इस्रायलच्या कारवाईचा निषेध करण्यात आला. हे युद्ध इतर देशांमध्येही पसरण्याची भीती बैठकीत व्यक्त करण्यात आली. 


बैठकीचे उद्घाटन करताना क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान म्हणाले की, पॅलेस्टिनी लोकांविरुद्ध होत असलेल्या गुन्ह्यांसाठी सौदी अरेबिया इस्रायली अधिकाऱ्यांना जबाबदार धरते. आम्हाला खात्री आहे की या प्रदेशात सुरक्षा, शांतता आणि स्थिरतेची हमी देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कब्जा, घेराबंदी संपवणे. करताना क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी गाझा आणि व्याप्त वेस्ट बँकमधील इस्रायलच्या कृतींबद्दल टीका केली. 






मार्चमध्ये दोन्ही देशांचे संबंध सुधारल्यानंतर सौदी अरेबियाच्या पहिल्या दौऱ्यावर आलेले इराणचे राष्ट्रपति इब्राहिम रायसी म्हणाले की, गाझामधील इस्रायली सैन्याच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर इस्लामिक देशांनी इस्रायलला "दहशतवादी संघटना" म्हणून घोषित केले पाहिजे.


अरब लीग आणि ओआयसी ही 57 सदस्यांची संघटना 


अरब लीग आणि ओआयसी ही 57 सदस्यीय संघटना असून त्यात इराणचाही समावेश आहे.या देशांच्या नेत्यांची यापूर्वी स्वतंत्रपणे बैठक होणार होती. अरबी राजनैतिक अधिकाऱ्यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की स्वतंत्र बैठकीऐवजी एक बैठक घेण्याचा निर्णय अरब लीगच्या शिष्टमंडळाने अंतिम विधानावर एकमत होण्यात अयशस्वी झाल्यानंतर घेतला.






इस्रायली सैन्याची गाझामध्ये जमिनीवर कारवाई 


इस्रायली सैन्य हमासचा खात्मा करण्यासाठी गाझा पट्टीमध्ये आपले ग्राउंड ऑपरेशन चालवत आहे. मात्र या कारवाईमुळे गाझा पट्टीतील रुग्णालयांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांना वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या औषधांचाही अभाव आहे. इस्रायलने गाझा पट्टीतील सर्वात मोठ्या रुग्णालयावर गोळीबार केल्याच्या वृत्ताचे ठामपणे खंडन केले आहे, परंतु त्यांचे सैन्य अल-शिफाजवळ हमासच्या लक्ष्यांना लक्ष्य करत असल्याचे म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या