वॉशिंग्टन : अमेरिकेत पुन्हा एका भारतीय तरुणाची हत्या झाली आहे. गुरुवारी मध्यरात्री अमेरिकेच्या राजधानीत ही हत्या झाली असून, विक्रम जरयाल असं मृत तरुणाचं नाव आहे. मात्र, पोलिसांनी ही हत्या वर्णद्वेषातून झाल्याची शक्यता फेटाळली आहे.
गुरुवारी याकिमी सिटीच्या AM-PM गॅस स्टेशनवरी एका दुकानात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत मृत्यू झालेला विक्रम जरयाल एका स्टोअरमध्ये क्लार्कचे काम करत होता. मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती स्टोअर लुटण्याच्या उद्देशाने आले. त्यांनी स्टोअर्समधील पैसे लुटल्यानंतर विक्रमवर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर विक्रमला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
विक्रम पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील रहिवाशी असून, तो एक महिन्यांपूर्वीच नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत गेला असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं.
विक्रमच्या हत्येनंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्वीट करुन विक्रमच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. तसेच त्याचे शव भारतात परत आणण्यासाठी भारतीय दूतावासाला सूचना दिल्या असल्याची माहिती दिली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत वर्णद्वेषातून भारतीय वंशियांच्या हत्येचं प्रमाण वाढलं आहे. फेब्रुवारीमध्ये अमेरिकेतून चालता हो, अशी धमकी देत श्रीनिवासन कुचीभोतला या 32 वर्षीय इंजिनिअरची हत्या झाली. यानंतरही हत्या आणि जीवघेण्या हल्याचं सत्र सुरुच आहे. 23 फेब्रुवारी रोजी मुळची आंध्र प्रदेशची रहिवाशी असलेल्या शशिकला आणि तिच्या सात वर्षांच्या चिमुरडीची हत्या करण्यात आली.
तर मार्चमध्ये न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या राजप्रीत एअर नावाच्या भारतीय वंशाच्या तरुणीला, अमेरिकेतून परत जाण्याची धमकी दिली होती. या घटनेचा व्हिडीओ राजप्रीतने न्यूयॉर्क टाईम्सच्या ‘धिस वीक इन हेड’ या सेक्शनवर पोस्ट केला होता.
दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा संबंध वर्णद्वेषाशी जोडण्यास नकार दिला आहे. पोलिसांच्या मते, ही घटना लुटच्या उद्देशातून झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.
संबंधित बातम्या
तुझ्या देशात परत जा!, अमेरिकेत पुन्हा शीख तरुणीशी गैरवर्तन
भारतीय महिला अभियंत्यासह लेकाची अमेरिकेत निर्घृण हत्या
अमेरिकेत 24 तासात भारतीय वंशाच्या व्यक्तीवर दुसरा प्राणघातक हल्ला
अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकाची गोळ्या झाडून हत्या
अमेरिकेमध्ये भारतीय इंजिनिअरच्या हत्येवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले…
‘माझ्या देशातून चालता हो,’ अमेरिकेत भारतीय इंजिनिअरची हत्या