स्वीडन : जगातील सर्वोच्च मानला जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. २०१९ मधील वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा आज (७ ऑक्टोबर) करण्यात आली. फिजीयोलॉजी क्षेत्रातील यशस्वी योगदानाबद्दल तीन शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यंदा विल्यम जी. केलिन ज्युनियर, सर पीटर जे रॅटक्लिफ आणि ग्रेग एल. सेमेन्झा यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पेशींद्वारे ऑक्सिजनच्या उपलब्धेनुसार होणारे वर्तन यावरील संशोधनासाठी त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा आठवडाभर करण्यात येणार आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांतता, अर्थशास्त्र या पाच क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा या आठवड्यात करण्यात येणार आहे.
साडेचार कोटी रुपये, २०० ग्रॅम सोन्याचे पदक आणि प्रशस्तीपत्रक असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पदकाच्या एका बाजूला नोबेल पुरस्कारचे जनक आल्फ्रेड नोबेल यांचे छायाचित्र, त्यांच्या जन्म आणि मृत्यूची तारीख लिहिलेली असते. तर पदकाच्या दुसऱ्या बाजूला युनानी देवी आइसिसचे चित्र आणि पुरस्कारार्थींची माहिती असते.
१९०१ ते २०१८ या कालावधीत वैद्यकीय क्षेत्रातील २१६ व्यक्तींना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २१६ व्यक्तींपैकी आतापर्यंत १२ महिलांना पुरस्कार देण्यात आला आहे. २००९ साली दोन महिलांना हा पुरस्कार देण्यात आला.
वैद्यकीय क्षेत्रातील इन्सुलीनचे संशोधन करणारे फ्रेडरिक जी. बॅन्टिंग हे सर्वात कमी वयात नोबेल पुरस्कर मिळवणारे विजेते ठरले. आतापर्यंत वैद्यकीय क्षेत्रात ३२ व्या वर्षी पुरस्कार मिळवणारे बॅन्टिंग हे तरुण पुरस्कार विजेते आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील तीन शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार जाहीर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Oct 2019 05:03 PM (IST)
मेडिसीन क्षेत्रातील यशस्वी योगदानाबद्दल तीन शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पेशींद्वारे ऑक्सिजनच्या उपलब्धेनुसार होणारे वर्तन यावरील संशोधनासाठी त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात येणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -