लिस्बन (पोर्तुगल) : वेव्ह सर्फिंग करताना पोर्तुगालमधल्या एका 36 वर्षीय पुरुषाच्या पाठीचं हाड मोडलं आहे. अन्ड्रयू कॉटन याचा वेव्ह सर्फिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मात्र, वेव्ह सर्फिंग करताना 50 फूट इतकी मोठी लाट उसळली, ज्यात कॉटन दूरवर फेकला गेला.

या अपघातात पाठीला मार बसल्यानं त्याच्या पाठीचं हाड मोडल. कॉटन याला पोर्तुगालमधील रुग्णालयात दाखल केलं असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या मोठ्या लाटेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यानं थेट समुद्रात उडी घेतली. त्यानंतर तात्काळ त्याला बाहेर काढण्यात आलं.

'प्रचंड मोठी लाट असल्यानं सर्फिंग बोर्डवरुन उडी मारणं गरजेचं होतं. मी तेवढंच करु शकत होतं. त्यामुळेच माझा जीव वाचू शकलो.' असं कॉटननं घटनेबद्दल बोलताना सांगितलं.

VIDEO :