Volodymyr Zelenskyy Vs Donald Trump : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली. यादरम्यान ट्रम्प, उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स आणि झेलेन्स्की यांच्यात जोरदार वादावादी झाली. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दंडेलशाहीला न जुमानता झेलेन्स्की ट्रम्प यांच्या डोळ्यात डोळे घालून भिडले. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 50 मिनिटे चर्चा झाली. या काळात असे अनेक प्रसंग आले की नेते एकमेकांकडे बोटे दाखवताना दिसले.

व्हाईट हाऊसच्या इतिहासात दोन राष्ट्रप्रमुखांमध्ये एवढ्या तणावपूर्ण संभाषणाची ही पहिलीच वेळ होती. उपाध्यक्ष  व्हॅन्स यांनी झेलेन्स्कीवर अमेरिकेचा अपमान केल्याचा आरोप केला. त्याचवेळी ट्रम्प यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना अनेकदा फटकारले. ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर तिसऱ्या महायुद्धासाठी जुगार खेळल्याचा आरोप केला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादानंतर व्हाईट हाऊसमधून बाहेर करण्यात आले. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 10 मिनिटे जोरदार वादावादी झाली.

सीएनएनच्या वृत्तानुसार, व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, वादविवादानंतर युक्रेनचे प्रतिनिधी ओव्हल ऑफिसमधून बाहेर पडले आणि दुसऱ्या खोलीत गेले. अमेरिकन टीम तिथेच राहिली. यादरम्यान ट्रम्प यांनी उपराष्ट्रपती व्हॅन्स, परराष्ट्र मंत्री रुबिओ आणि एनएसए माईक वॉल्ट्ज यांच्याशी चर्चा केली. चर्चेदरम्यान ट्रम्प म्हणाले की झेलेन्स्की वाटाघाटी करण्याच्या स्थितीत नाहीत. त्यानंतर त्यांनी माईक वॉल्ट्झ आणि रुबियो यांना जाण्यास सांगितले आणि झेलेन्स्की यांना स्वतः सांगायला सांगितले की त्यांची जाण्याची वेळ आली आहे. जेव्हा हे दोन अधिकारी तेथे आले तेव्हा झेलेन्स्की यांनी त्यांना सांगितले की ते सर्व गोष्टी ठीक करू शकतात. झेलेन्स्की यांनी पुन्हा ट्रम्प यांच्याशी वाटाघाटी करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यांना ही संधी देण्यात आली नाही. दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषदही होणार होती ती रद्द करण्यात आली. यानंतर, संतप्त झेलेन्स्की संभाषणातून उठले, पटकन बाहेर पडले आणि त्याच्या काळ्या एसयूव्हीमध्ये हॉटेलकडे निघून गेले. दोन्ही नेत्यांमध्ये खनिजांबाबत करार होणार होता, परंतु हा संवाद रद्द करण्यात आला.

ट्रम्प म्हणाले, झेलेन्स्की चांगली तयारी करून आले आहेत

झेलेन्स्की रात्री दहाच्या सुमारास ट्रम्प यांना भेटण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले तेव्हा ट्रम्प यांनी दारात येऊन त्यांचे स्वागत केले. दोघांनी हस्तांदोलन केले, त्यानंतर ट्रम्प झेलेन्स्कीकडे बोट दाखवत मीडियाला म्हणाले, 'ते आज चांगली तयारी करून आले आहेत.'

झेलेन्स्की यांना ट्रम्प यांना युद्धाचे फोटो दाखवले

दोन्ही राष्ट्राध्यक्ष व्हाईट हाऊसच्या ओव्हल हाऊसमध्ये पोहोचले. इकडे दोघांमध्ये माध्यमांशी संवाद सुरू झाला. ट्रम्प म्हणाले की ते आणि झेलेन्स्की यांनी मिळून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवले तर खूप चांगले होईल. झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांना युद्धाचे फोटो दाखवले.

झेलेन्स्की म्हणाले, शांतता करारात पुतिन यांच्यासोबत कोणतीही तडजोड होऊ नये ट्रम्प यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान झेलेन्स्की म्हणाले, 'शांतता करारात रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यासोबत कोणतीही तडजोड केली जाऊ नये.' यावर ट्रम्प म्हणाले, 'आम्हाला हे युद्ध लवकरात लवकर संपवायचे आहे. आशा आहे की आम्हाला अधिक सैन्य पाठवावे लागणार नाही. मी खनिज सौद्याचे कौतुक करतो कारण आम्हाला त्याची गरज होती. मी रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी समन्वय साधला नसता तर कोणताही करार होऊ शकला नसता, असे ट्रम्प म्हणाले. मी पुतिन यांच्यासोबत नाही आणि इतर कोणाशीही नाही. मी फक्त अमेरिकेसोबत असल्याचे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या