America on BLA : अमेरिकेने बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि तिचे उर्फ मजीद ब्रिगेड यांना परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. अनेक हल्ल्यांनंतर हे पाऊल उचलण्यात आले. पाकिस्थानचे लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेला भेट दिली आहे. असे असताना सोमवारी (11 ऑगस्ट 2025) अमेरिकेने पाकिस्थानसंदर्भात एक मोठे पाऊल उचलले आहे. ज्यामध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) आणि त्याचे टोपणनाव असलेल्या माजिद ब्रिगेड यांना अधिकृतपणे परदेशी दहशतवादी संघटना (FTO) म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी या निर्णयाची पुष्टी करणारे एक निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी सांगितले की, 2019 पासून, बीएलएने अनेक मोठ्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे, ज्यामध्ये माजिद ब्रिगेडने केलेला हल्ला देखील समाविष्ट आहे.
बीएलए आधीच अमेरिकेच्या रडारवर होता आणि 2019 मध्ये त्याला विशेष नियुक्त जागतिक दहशतवादी (SDGT) संघटना म्हणून घोषित करण्यात आले होते. तेव्हापासून या संघटनेने अनेक आत्मघाती बॉम्बस्फोट, हाय-प्रोफाइल हल्ले आणि अलीकडील जाफर एक्सप्रेस ट्रेन अपहरण सारख्या घटनांची जबाबदारी स्वीकारली आहे.
कराची ते ग्वादर आणि क्वेट्टा पर्यंतच्या अलीकडील हल्ल्यांची स्वीकारली जबाबदारी
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या मते, 2024 मध्ये, बीएलएने कराची विमानतळ आणि ग्वादर पोर्ट अथॉरिटी कॉम्प्लेक्सजवळील आत्मघाती हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली. मार्च 2025 मध्ये, या संघटनेने क्वेट्टाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण केले, ज्यामध्ये 31 जणांचा मृत्यू झाला आणि 300 हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवले. या घटनांनी केवळ पाकिस्तानच नव्हे तर संपूर्ण प्रदेशाच्या सुरक्षा आणि स्थिरतेला आव्हान दिले. अमेरिकेच्या निवेदनात म्हटले आहे की दहशतवादाला होणारा निधी आणि पाठिंबा थांबवण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे आहे.
FTO घोषित करण्याचे परिणाम
BLA आणि मजीद ब्रिगेडला FTO घोषित केल्यानंतर, अमेरिकन सरकार आता अमेरिकेतील त्यांची मालमत्ता जप्त करू शकते. या संघटनेला आर्थिक किंवा थेट पाठिंबा देणे हा फौजदारी गुन्हा ठरेल. अमेरिका इतर देशांशी सहकार्य करून त्यांचे नेटवर्क आणि कारवाया बंद करू शकते.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी दीड महिन्यांत दुसऱ्यांदा अमेरिकेला भेट दिली आहे. डॉनच्या वृत्तानुसार, ते अमेरिकेत कधी पोहोचले याची माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, त्यांच्या जाण्यानंतर त्यांनी अमेरिकन भूमीवरून भारताविरुद्ध विषारी विधान देखील केले आहे. याशिवाय, अलिकडच्या काळात अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध सौहार्दपूर्ण झाले आहेत. याचा परिणाम म्हणून अमेरिकेने बीएलएला दहशतवादी संघटना घोषित केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या