नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी पहिल्यांदा विविध देशावंर टॅरिफ लादलं. भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं. अमेरिकेतील आयटी कंपन्यांना आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळासाठी गरजेचा असलेल्या एचवनबी व्हिसाचं शुल्क देखील वाढवण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे. आता ट्रम्प प्रशासनाच्या नव्या नियमानुसार विदेशी नागरिकांनी अमेरिकेत वास्तव्यासाठी व्हिसाचा अर्ज केल्यास आणि ते मधुमेह, लठ्ठपणा आणि ह्रदय विकार या सारख्या आजारांनी ग्रस्त असतील तर त्यांचा व्हिसाचा अर्ज नाकारण्यात येऊ शकतो. ट्रम्प प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सीबीएस न्यूजच्या रिपोर्टनुसार मार्गदर्शक सूचना उच्चायूक्त कार्यालयांना आणि अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत. व्हिसा अधिकाऱ्यांनी व्हिसा अर्ज मंजूर करताना अर्जदाराच्या आरोग्याचा विचार करावा असंही सांगण्यात आलं आहे.
US Visa Rules : व्हिसाचे नियम आणखी कडक
अर्जदार जर दुसऱ्यावर अवंलबून असेल किंवा शासकीय अनुदात वैद्यकीय व्यवस्थेवर अवंलबून असेल तर त्यासाठी पब्लिक चार्जेस अशी वर्गवारी करावी, असं सांगण्यात आलं आहे. व्हिसाच्या अर्जदारांची आरोग्य तपासणी करण्यात येते मात्र तज्ज्ञांच्या मते त्याची कक्षा वाढवण्यात येत आहे. अर्जदाराच्या आरोग्याचा खर्च आणि वैद्यकीय धोका लक्षात घेता अर्ज नामंजूर करण्यास कॉन्सुलर अधिकारी सर्वोच्च अथॉरिटी असेल.
व्हिसा मंजूर करणाऱ्यांना अर्जदाराच्या आरोग्याचा विचार करण्यास सांगण्यात आलं आहे. ह्रदयविकार, कॅन्सर, मधूमेह, मेटाबॉलिक डिसेझ, मानिसक समस्या असणारे आजार ज्यावर अधिक खर्च करावा लागतो. याशिवाय लठ्ठपणामुळं अस्थमा आणि उच्च रक्तदाब यासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळं अधिक वैद्यकीय खर्च करावा लागतो. रिपोर्टनुसार व्हिसा अधिकाऱ्यांना अर्जदार स्वत: वैद्यकीय उपचार घेऊ शकतात याची विचारणा करण्यास सांगण्यात आलं आहे. याशिवाय अर्जदारावर अवलंबून असणारी त्यांची मुलं आणि त्यांचे पालक यांच्या आरोग्याची माहिती देखील घ्यावी असं सांगण्यात आलं आहे.
एचवन बी व्हिसाचं शुल्क वाढवलं
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या टर्ममध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेला पुन्हा महान करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. ट्रम्प यांनी दुसऱ्या टर्ममध्ये विविध देशांवर टॅरिफ लादत अमेरिकेला फायदा होतील, असे व्यापारी करार करुन घेतले. भारतासारख्या देशावर 50 टॅरिफ ट्रम्प यांनी लादलं आहे. अमेरिकेत कर्मचारी म्हणून जो व्हिसा दिला जातो त्याला एचवन बी व्हिसा म्हटलं जातं. त्यासाठी नव्यानं अर्ज करायचा असेल तर आता 1 लाख अमेरिकन डॉलर्स द्यावे लागतात. हे शुल्क यापूर्वी 1000 डॉलर्स इतकं होतं.