वॉशिंग्टन डी सी : एखादी मोठी इमारत उभी करायची म्हटलं की त्यासाठी कित्येक महिने मेहनत घ्यावी लागते. या कामासाठी कित्येक लोक झटत असतात. पण दिवसरात्र एक करून उभा केलेली हीच इमारत अवघ्या काही सेकंदांत जमीनदोस्त होऊ शकते. अमेरिकेतील लुसियाना येथे असंच घडलं आहे. येथे एक 22 मजली इमारत अवघ्या 15 सेकंदांत थेट बॉम्बने उडवून दिली आहे.  या इमारतीचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. 


अवघ्या 15 सेकंदांत इमारत जमीनदोस्त


सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ मुळचा अमेरिकेतील लुसियाना राज्याचा आहे. या राज्याच्या सरकारने येथील 22 मजली इमारत बॉम्बने पाडण्याचा निर्णय घेतला. बॉम्बने पाडण्यात आलेल्या इमारतीचे नाव हर्ट्झ टॉवर असे आहे. ही गगनचुंबी इमारत बॉम्बच्या मदतीने अवघ्या 15 सेकंदांत पाडण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या इमारतीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र शनिवारी (7 सप्टेंबर) ही इमारत पाडण्यात आली.


पाहा व्हिडीओ :






22 मजली इमारत बॉम्बने का पाडण्यात आली? 


ही इमारत तब्बल 22 मजल्यांची होती. मात्र गेल्या काही वर्षांत या इमारतीचे बांधकाम कमवकुवत झाल होते. चार वर्षांपूर्वी लॉरा नावाचे एक चक्रीवादळ आले होते. या वादळामुळे या इमारतीची मोठी हानी झाली होती. तेव्हापासून या इमारतीचे आयुष्य कमी होण्यास सुरुवात झाली होती. ही इमारत अशीच उभी राहिली तर मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. लॉरा चक्रीवादळानंतर ही इमारत रिकामी करण्यात आली होती. 
आता मात्र भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेता ही इमारत थेट बॉम्बने उवडण्यात आली आहे. ही इमारत लुसियाना स्टेटमधील चार्ल शहरात ही इमारत होती. या इमारतीला शहराचे महापौर निक हंटर यांच्या उपस्थितीत जमीनदोस्त करण्यात आले. या इमारतीचा मालक आणि रियल इस्टेट फर्म हर्ट्झ इन्व्हेस्टमेंट ग्रुपमध्या नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून कोर्टात लढाई चालू होती. मात्र या दोन्ही पक्षांत आता तोडगा निघाला आहे. त्यामुळे ही इमारत पाडण्यात आली. 


चार दशकांपासून उभी होती इमारत


बॉम्बने पाडण्यात आलेल्या इमारतीला अगोदर कॅपिटल वन टॉवर या नावाने ओळखले जात होते. गेल्या चार दशकांपासून ही इमारत दिमाखात उभी होती. मात्र चक्रीवादळात या इमारतीचे मोठे नुकसान झाले. तिच्या अनेक खिडक्या तुटल्या होत्या. त्यामुळे आता ही इमारत पाडण्यात आली आहे.   


हेही वाचा :


Panama Deports Indians : शाहरुखचा 'डंकी' आठवतो का? तो 'डंकी' मार्ग काय आहे तरी काय? 130 भारतीय हद्दपार, अमेरिका ठरली कारणीभूत!