World Whisky Day 2021 : आज जगभरात वर्ल्ड व्हिस्की डे साजरा केला जातोय. हा दिवस दरवर्षी मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा केला जातोय. वर्ल्ड व्हिस्की डे साजरा करायला 2012 साली सुरुवात झाली. आजच्या घडीला व्हिस्की मिळत नाही असा जगातला एकही देश वा एकही शहर शोधूनही सापडणार नाही. भारतात मद्य प्रेमी व्हिस्कीला पसंती देतात.
व्हिस्की हा शब्द usquebaugh या शब्दापासून म्हणजे Ooshky-bay असा उच्चार होणाऱ्या शब्दापासून तयार झाला आहे. Ooshky-bay म्हणजे वॉटर ऑफ लाईफ. या शब्दाचा नंतर शॉर्टफॉर्म करण्यात आला आणि व्हिस्की हा शब्द तयार करण्यात आला.
व्हिस्की हे एक मादक पेय आहे जे गहू, ज्वारी, राई आणि मक्क्यापासून बनवलं जातं. साधारणपणे व्हिस्की दोन प्रकारच्या असतात, माल्टा व्हिस्की आणि ग्रेन व्हिस्की. असं सांगण्यात येतंय की व्हिस्कीचा सर्वप्रथम उल्लेख हा 15 व्या शतकात, स्कॉटलंडमध्ये आढळतो. अमेरिकेत व्हिस्कीचे उत्पादन 18 व्या शतकापासून होतंय.
स्कॉटलंडची व्हिस्की ही सर्वात चांगल्या प्रतीची मानली जाते. या देशातील व्हिस्कीला स्कॉच असं म्हटलं जातं. भारतातही व्हिस्की मोठ्या प्रमाणावर तयार केली जाते. भारतातल्या आणि जगभरातले कोणतेही सेलिब्रेशन हे व्हिस्की शिवाय साजरं करता येऊ शकत नाही.
महत्वाच्या बातम्या :