Aliens Birth Study : पृथ्वी (Earth) प्रमाणे इतर ग्रहांवरही (Planet) जीवन असून त्याबाबत जगभरातील शास्त्रज्ञांकडून (Scientist) संशोधन सुरु आहे. परग्रहावरील एलियन्सचं (Aliens) अस्तित्व शोधण्यासाठी जगभरातील विविध शास्त्रज्ञ अथक परिश्रम घेत आहेत. आतापर्यंतच्या संशोधनामध्ये महत्वाची माहिती समोर आली आहे. यापलिकडे सुद्धा अवकाशात अनेक रहस्य दडल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात येतो. दरम्यान, एलियन्सच्या अस्तित्वाबाबत शास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. याबाबत विविध दावे-प्रतिदावे करण्यात आले आहेत.


एलियन्सच्या अस्तित्वाबाबत महत्वाची माहिती


आता एका नव्या संशोधनातून एलियन्सबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. या संशोधनामध्ये एलियन्सच्या निर्मितीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. एलियन्सच्या निर्मिती बाबतच्या या दाव्यामुळे अवकाश आणि त्यातील रहस्यांबद्दलचं कुतूहल आणखी वाढलं आहे. या संशोधनानुसार, पृथ्वीवर मानवाची निर्मिती झाली, त्याप्रमाणे एलियन्सची निर्मिती झालेली नाही. एलियन्स निर्माण होण्याची प्रक्रिया मानवाच्या निर्मिती प्रक्रियेपेक्षा वेगळी असल्याचा दावा या संशोधनात करण्यात आला आहे. 


एलियन्स कसे तयार होतात?


या संशोधनानुसार, मातेच्या पोटात रासायनिक प्रक्रिया होऊन मानवाची निर्मिती होते, त्याप्रकारे एलियन्सची निर्मिती होत नाही. एलियन तयार होण्याची प्रक्रिया मानवाच्या उत्पत्तीपेक्षा वेगळी असू शकते. थोडक्यात सांगायचं झालं तर, मानवाच्या शरीरात प्रक्रिया घडून भ्रूण तयार होतं म्हणजे मानवाची उत्पत्ती. मात्र, एलियन्सची निर्मिती वातावरणातील रासायनिक प्रक्रियेमुळे होऊ शकतो, असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे. विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठाचे (University of Wisconsin-Madison) खगोलशास्त्रज्ञ बेतुल काकर यांनी सांगितलं की, आपण सर्व शक्यतांचा शोध घेणं महत्त्वाचं आहे. यामुळे फक्त पृथ्वीवरील जीवनाच्या उत्पत्तीबाबतच नाही तर सर्व ग्रहांवरील सर्व प्रकारचे जीव आणि जीवसृष्टी याबाबतच्या रहस्यांवरील पडदा उघडेल.


एलियन्सबाबत धक्कादायक माहिती


शास्त्रज्ञांनी एलियन्सबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपोआप घडणाऱ्या रासायनिक प्रक्रियांमुळे एलियन्सची निर्मिती म्हणजे जन्म होत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अभ्यासाद्वारे, एलियन हे पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या घटकांपेक्षा पूर्णपणे भिन्न असलेल्या घटकांपासून बनलेले आहेत का आणि असल्याचं ते घटक कोणते हे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे वेगळे घटक एलियन्सला त्यांच्या ग्रहावर राहण्यास कशाप्रकारे सक्षम बनवतात आणि ते पृथ्वीवरील वातावरणात जिवंत राहू शकतात की नाही याबाबत हे संशोधन आहे.


परग्रहावरील जीवसृष्टी कशी विकसित होते?


एका अहवालानुसार, पृथ्वीवरील जीव सेंद्रिय संयुगांवर (Autocatalysis) अवलंबून आहेत. कार्बन व्यतिरिक्त, यामध्ये फॉस्फरस, सल्फर, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन सारख्या घटकांचा समावेश आहे. शास्त्रज्ञांच्या मते, पर्यायी रासायनिक संरचनेमुळे परकीय जीवांचा जन्म होऊ शकतो. शास्त्रज्ञ दीर्घकाळापासून रसायनशास्त्राच्या आधारे परग्रहावरील जीवसृष्टी विकसित होऊ शकते का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत अधिक संशोधन सुरु आहे.


महत्वाच्या इतर बातम्या : 


Aliens : अखेर एलियन्सच्या अस्तित्वाचा पुरावा सापडला! मेक्सिकोच्या संसदेत 1000 वर्षांपूर्वीच्या दोन एलियन्सचे मृतदेह