मेक्सिको सिटी :  स्वित्झर्लंड पाठोपाठ मेक्सिकोनेही अण्वस्त्र पुरवठादार गट अर्थात न्यूक्लियर सप्लायर्स ग्रुप (एनएसजी) राष्ट्र समूहाच्या सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दिला आहे.

 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाच देशांच्या दौऱ्यातील अंतिम टप्पा मेक्सिकोमध्ये होता. यावेळी पंतप्रधान मोदींनी मेक्सिकोचे अध्यक्ष एनरिक पेना नीटो यांची भेट घेतली.

 

यावेळी नीटो यांनी भारताच्या एनएसजी सदस्यत्वाला पाठिंबा दिल्यामुळे, मोदींनी त्यांचे आभार मानले.

 

यानंतर मोदी - नीटो यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मोदींनी मेक्सिकोसोबत माहिती तंत्रज्ञान, औषध उद्योग आणि ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये व्यापार आणि गुतंवणुकीवर भर दिला. त्याशिवाय त्यांनी अंतराळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही गुंतवणुकीची आशा व्यक्त केली.

 

मोदींनी आपल्या भाषणाचा शेवट मेक्सिकोचे प्रसिद्ध कवी ऑक्टोवियो पाज यांच्या वाक्याने केलं. "मी समझू शकतो की भारतीय होण्याचा काय अर्थ आहे, कारण मी एक मेक्सिकन आहे".

 

मोदींनी याचा पुनरुच्चार करत, आम्ही भारतीय सुद्धा मेक्सिकोबाबत हेच म्हणू शकतो, असं नमूद केलं.

 

राष्ट्राध्यक्षांकडून मोदींचं सारथ्य

दरम्यान,  एनएसजी पाठिंब्यानंतर मेक्सोकाचे राष्ट्राध्यक्ष एनरिक पेना नीटो यांनी मोदींसाठी स्वत: ड्रायव्हिंग केलं. नीटो यांनी स्वत: गाडी चालवत जेवणासाठी मोदींना हॉटेलपर्यंत घेऊन गेले.

 

संबंधित बातम्या


8 स्टँडिंग ओव्हेशन, 66 वेळा टाळ्यांच्या गजरात दाद, मोदींनी अमेरिकन संसद गाजवली 


भारताच्या शेजारी दहशतवाद्यांचा गड, मोदींचा पाकिस्तानवर निशाणा


मोदींच्या अमेरिका दौऱ्यातील एक यश, एमटीसीआर आहे तरी काय?