मुंबई: कोणत्याही खेळाबाबतची भविष्यवाणी कधी पथ्यावर पडेल, तर कधी अंगलट येईल हे सांगता येत नाही. जिंकत आलेल्या संघाला पराभवाला सामोरं जावं लागतं, तर कधी हरणारी टीम विजयापर्यंत पोहोचते. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकेल हे सांगणं किंवा त्याबाबतची पैज लावणं तुम्हाला कधी-कधी महागात पडू शकतं.
असंच काहीसं कॅनडाची टेनिस स्टार जिनी बुचार्डच्या बाबतीत घडलं. यूएस सुपर बाऊलच्या एका टेनिस सामन्यात, ट्विटरवरील एका चाहत्यासोबतची पैज बुचार्ड हरली. त्यामुळे एका 20 वर्षाच्या युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यासोबत तिला डेटवर जावं लागलं.

https://twitter.com/geniebouchard/status/832019611277144064

जिनी बुचार्ड

अटलांटा फाल्कन आणि इंग्लंड पॅट्रियट्स यांच्यात टेनिसचा सामना रंगला होता. अटलांटा फाल्कन टीम 21-0 ने आघाडीवर होती. त्यावेळी बुजार्डने आता फाल्कनला विजयापासून कोणीही रोखू शकत नाही, असं ट्विट केलं.

https://twitter.com/geniebouchard/status/828403616180498433
मात्र पॅट्रियट्सचा 20 वर्षीय चाहता जॉन जोहर्केने बुचार्डशी पैज लावून, आमचाच संघ जिंकणार, असं ट्विट केलं.
बुजार्डने जोहर्केचं आव्हान स्वीकारलं. त्यानंतर सामन्यातील रंग बदलत गेला आणि सामन्याचं रुपच पालटलं. पॅट्रियट्सने सामन्यात पुनरागमन करुन मॅचही जिंकली.
बुचार्डने मग हार स्वीकारत, दिलेला शब्द पूर्ण केलं. इतकंच नाही तर जोहर्केसोबत ती डेटवरही गेली. त्याचे फोटो बुचार्डने ट्विट केले आहेत.

https://twitter.com/geniebouchard/status/832307660426850304