इस्लामाबाद : मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला पाकिस्तान सरकारने नजरकैदेत ठेवून त्याच्या जमात-उद-दावा संघटनेवर कारवाई सुरु केल्यानंतर तो आता नव्या संघटनेसह पुन्हा सक्रिय झाला आहे. जमात-उद-दावाने आपलं नाव बदलून आता 'तहरीक आजादी जम्मू-काश्मीर' (टीएजेके) असं ठेवलं आहे.


काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी आपली मोहिम आणखी जलद करण्यासाठी टीएजेके ही नवी संघटना सुरु करण्याचे संकेत हाफिजने त्याला नजरकैदेत ठेवण्याच्या एक आठवडा अगोदरच दिले होते.

सरकार आपल्यावर कारवाई करणार हे हाफिजला माहित होतं का, असा सवाल आता केला जात आहे. कारण जमात-उद-दावा आणि 'फलाह-ए-इन्सानियत'वर कारवाई केल्यानंतर पुन्हा संघटन कसं तयार करायचं, याची योजना हाफिजने अगोदरच करुन ठेवली होती.

टीएजेके या नावाने दोन दहशतवादी संघटनांनी कारवाई सुरु केल्याची माहिती आहे. पाच फेब्रुवारीला या संघटनांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केल्याचंही बोललं जात आहे. हा दिवस पाकिस्तानमध्ये 'काश्मीर दिन' म्हणून साजरा केला जातो. तसंच लाहोरसह इतर शहरांमध्ये टीएजेकेचे बॅनर झळकले आहेत.

संबंधित बातम्या :

26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद नजरकैदेत


ट्रम्प-मोदींमुळे नजरकैद, हाफिज सईदची गरळ