टोरंटो : कॅनडाच्या टोरंटोमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. व्हॅन आणि ट्रॅक्टर ट्रेलर यांच्या जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाल्याचं कळतं.


कॅनडामधील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्या माहितीनुसार, "हा अपघात 13 मार्च रोजी झाला. टोरंटोजवळ झालेल्या या अपघातात पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर दोन जखमी आहेत. टोरंटोमधील भारताच्या वाणिज्य दूतावासाची टीम मदतीसाठी मृत आणि जखमी विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे."






हरप्रीत सिंह, जसपिंदर सिंह, करनपाल सिंह, मोहित चौहान आणि पवन कुमार अशी अपघातातील मृत विद्यार्थ्यांची नावं आहे. हे मृत विद्यार्थी 21 ते 24 वर्षे वयोगटातील आहेत.सर्व मृत विद्यार्थी ग्रेटर टोरंटो आणि मोंट्रेयल क्षेत्रातील असल्याचं सांगितलं जातं.


स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, "हा अपघात रविवारी पहाटे 3.45 वाजता हायवे-401 वर झाला. इतर दोन विद्यार्थ्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे." दरम्यान पोलिसांनी अपघाताचा तपास सुरु केला आहे. 


महाराष्ट्रातही अपघाताचं सत्र 


दरम्यान, तिकडे कॅनडामध्ये विद्यार्थ्यांचा अपघात झाला असताना, इकडे महाराष्ट्रात वारकरी-भक्तांचा अपघात झाला.  पंढरपूरला वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला मालट्रकने मागून धडक दिली. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी आहेत. 


तिकडे बुलढाण्याजवळ शेगावातही भीषण अपघात झाला.  दर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या बोलेरो गाडी आणि ट्रकच्या धडकेत 5 भाविकांचा मृत्यू झाला. या अपघातात 4 भाविक जखमी आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  


संबंधित बातम्या


Buldhana Accident : शेगावला दर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या बोलेरो गाडीला भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू


Solapur Accident : ...अन् वाटेतच मृत्यूनं गाठलं; पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर सोलापुरात काळाचा घाला, चौघांचा दुर्दैवी मृत्यू