तेल अवीव : परराष्ट्र धोरणात नवा इतिहास रचत पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. इस्रायलला भेट देणारे मादी भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत. 'आपका स्वागत है मेरे दोस्त' असं म्हणत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोदींचं हिंदीत स्वागत केलं.
इस्रायलची राजधानी तेल अवीवच्या विमानतळावर मोदींच्या स्वागतासाठी स्वतः नेतन्याहू हजर होते. दोघांनी 15 मिनिटात तीन वेळा गळाभेट घेत दोन्ही देशांच्या चांगल्या संबंधांचा नवा अध्याय लिहिला.
तेल अवीव विमानतळावरच मोदींच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली होती. त्यानंतर हिंदीमध्ये मोदींचं इस्रायलमध्ये स्वागत करण्यात आलं.
तीन दिवसीय इस्रायल दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेतन्याहू यांच्या द्विपक्षीय चर्चेसोबतच अनेक महत्वाचे करारही केले जाणार आहेत.