Vladimir Putin : रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अधिकृत कार ताफ्याचा भाग असणारी ऑरस लिमोझिनमध्ये (luxury limousine from Vladimir Putin official) एफएसबी गुप्त सेवा मुख्यालयाजवळील मॉस्को रस्त्यावर स्फोट होऊन आग लागली. घटनेच्या फुटेजमध्ये $3,55,796 ऑरस सेनाट आगीच्या ज्वाळांनी वेढलेले दिसत आहे, आग इंजिनपासून आतील भागात पसरली आहे. ही कार मॉस्कोच्या प्रेसिडेंशियल प्रॉपर्टी मॅनेजमेंट डिपार्टमेंटची असल्याचे सांगण्यात आले. परंतु त्यात कोण होते किंवा स्रेतेन्का स्ट्रीटवर अचानक आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. डेली एक्सप्रेसने वृत्त दिले आहे की, यात कोणतीही दुखापत किंवा मृत्यू झाल्याची नोंद नाही. सोशल मीडियावरील काही लोकांनी मात्र सांगितले की ही लिमो पुतिन यांच्या ताफ्याच्या गाड्यांमध्ये नव्हती.

72 वर्षीय रशियन राष्ट्राध्यक्ष अनेकदा रशियन बनावटीच्या ऑरस वाहने वापरतात आणि त्यांनी ती उत्तर कोरियाचे किम जोंग-उन यांच्यासह परदेशी नेत्यांना भेट दिली आहेत. या घटनेमुळे हत्येच्या कटांबद्दल रशियाची चिंता वाढण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, रशियाने इशारा दिला होता की पुतिन यांच्या जीवावर कोणताही प्रयत्न केल्यास अणुप्रक्रिया घडेल. रशियन संसदेचे सभापती व्याचेस्लाव वोलोडिन यांनी अशा चर्चांना "जागतिक सुरक्षेसाठी गंभीर धोका" म्हटले आहे.

युक्रेनचे लष्करी गुप्तचर प्रमुख किरिलो बुडानोव्ह यांनी पुतिन यांच्यावर अनेक हत्येचे प्रयत्न झाल्याचा दावा केला आहे. अनेक उच्च-प्रोफाइल रशियन लष्करी मृत्यूंनंतर हा स्फोट झाला आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. डिसेंबरमध्ये, युक्रेनमध्ये रासायनिक युद्धाचे निरीक्षण केल्याचा आरोप असलेले लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोव्ह मॉस्कोमध्ये झालेल्या स्फोटात मारले गेले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या