Former OpenAI researcher found dead : चॅटजीपीटी (ChatGPT) मेकर ओपनएआयचे (OpenAI) व्हिसलब्लोअर सुचीर बालाजी सॅन फ्रान्सिस्कोमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले आहेत. 26 वर्षीय बालाजीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. 26 नोव्हेंबर रोजी बुकानन स्ट्रीटवरील त्यांच्या फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह सापडला होता. सॅन फ्रान्सिस्को पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद माहिती आढळली नाही आणि त्याने आत्महत्या केल्याचे दिसते. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. बालाजीच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांनी नोव्हेंबर 2020 ते ऑगस्ट 2024 पर्यंत OpenAI सोबत काम केले.






OpenAI कडून सुचीर बालाजीच्या मृत्यूला दुजोरा


बालाजी यांच्या मृत्यूची पुष्टी त्यांच्या माजी कंपनी ओपनएआयने केली आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, ही दुःखद बातमी ऐकून आम्हाला धक्का बसला आहे आणि आम्ही या कठीण काळात सुचीर यांच्या प्रियजनांप्रती शोक व्यक्त करतो. अमेरिकन अब्जाधीश एलोन मस्क यांनीही 'हम्म' लिहून बालाजींच्या मृत्यूची माहिती असलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. मस्क यांनी 2015 मध्ये सॅम ऑल्टमनसोबत OpenAI सुरू केले होते, परंतु सध्या दोघांमध्ये वाद सुरू आहे.




OpenAI वर प्रश्न उपस्थित केले गेले


सुचीर बालाजी यांनी त्यांच्या मृत्यूच्या तीन महिन्यांपूर्वी जाहीरपणे दावा केला होता की OpenAI ने US कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केले होते. ChatGPT ची निर्मिती Open AI द्वारे केली गेली आणि जागतिक स्तरावर लाखो वापरकर्त्यांसह व्यापक व्यावसायिक यश अनुभवत आहे. 2022 च्या उत्तरार्धात हे ॲप लॉन्च केल्यामुळे लेखकांकडून अनेक कायदेशीर आव्हाने उभी राहिली होती. त्या वेळी, अनेक लेखक, प्रोग्रामर आणि पत्रकारांनी आरोप केला होता की कंपनीने त्यांचे ॲप विकसित करण्यासाठी त्यांच्या कॉपीराइट केलेल्या सामग्रीचा बेकायदेशीरपणे वापर केला होता.


23 ऑक्टोबर रोजी परदेशी मीडियाला मुलाखत देताना बालाजी यांनी असा युक्तिवाद केला होता की OpenAI चा व्यवसाय आणि उद्योजकांवर नकारात्मक परिणाम होत आहे ज्यांचा वापर ChatGPT ला प्रशिक्षण देण्यासाठी माहिती मिळविण्यासाठी केला जात होता. ते म्हणाला की, माझ्या म्हणण्यावर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला कंपनी सोडावी लागेल. ते असेही म्हणाले, “इंटरनेट इकोसिस्टमसाठी हे टिकाऊ मॉडेल नाही.


इतर महत्वाच्या बातम्या