कोलंबिया : ब्राझीलच्या फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणारं विमान क्रॅश झाल्याने 76 जणांचा मृत्यू झाला आहे. तर केवळ पाच जण बचावले आहेत. विमानात 72 प्रवाशांसह 9 क्रू मेंबर होते. कोलंबियात हे विमान कोसळलं.
या विमानात ब्राझीलच्या शॅपाकोईन्सी या स्थानिक फुटबॉल टीममधील खेळाडू होते. हे विमान बोलिवियावरुन मॅडलिन विमानतळाकडे जात होतं. त्यावेळी कोलंबियात या विमानाला अपघात झाला.
दोन फुटबॉलपटू, एक पत्रकार, एक अन्य प्रवासी आणि एक क्रू मेंबरच या अपघातातून बचावले. डिफेंडर अॅलन रशेल आणि फॉलमन हे दोन फुटबॉलपटू बचावले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ब्राझीलच्या फुटबॉलपटूंना घेऊन जाणारं विमान कोसळलं
शॅपाकोईन्सी संघाचा दक्षिण अमेरिकेतील फुटबॉल चषकात एटलेटिको नेसियोनाल संघाशी सामना होता. मात्र विमानाच्या अपघातामुळे अंतिम सामना स्थगित करण्यात आला आहे.
विमानतळाच्या माहितीनुसार, कंट्रोल टॉवरमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने विमान कोसळलं.