72 Foot Asteroid Alert : एकीकडे संपूर्ण जग नवीन वर्ष (New Year Celebration) जल्लोषात आणि उत्साहात साजरे करताना दिसत आहे, मात्र दुसरीकडे पृथ्वीवर (Earth) एक मोठं संकट येण्याची शक्यता आहे. एक विशाल उपग्रह (Asteroid) पृथ्वीच्या दिशेने सरकत आहे. अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने (NASA) याबाबत एक धोक्याचा इशारा दिला आहे. एक विशाल 72 फूट लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने सरकत असल्याची माहिती नासाने दिली आहे.


पृथ्वीच्या दिशेने सरकतोय विशाल लघुग्रह


नासा अवकाश संस्था अंतराळात होत असलेल्या बदलांची आणि त्याच्याशी संबंधित नवीन अपडेट्सची माहिती देत ​​असते. यावेळी नासाने पृथ्वीवर येणार्‍या नवीन धोक्याचा इशारा दिला आहे. एक विशाल 72 फूट लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने सरकत आहे. नासाने या उपग्रहाचा वेग, पृथ्वीपासूनचे त्याचे अंतर याबाबतची माहिती दिली आहे.


गेल्या लाखो वर्षांत लघुग्रह पृथ्वीवर एकापेक्षा जास्त वेळा आदळले आहेत. नासाने आता थेट पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या लघुग्रहाबाबत अलर्ट जारी केला आहे. नासाचे प्लॅनेटरी डिफेन्स कोऑर्डिनेशन ऑफिस पृथ्वीच्या 8 दशलक्ष किलोमीटरच्या आत येणाऱ्या जवळ-अर्थ ऑब्जेक्ट्स (NEOS) म्हणजे खगोलीय वस्तूंबद्दल अलर्ट जारी करते. 


72 फूट लघुग्रह 2022 YR1 पृथ्वी जवळून जाणार


नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने (JPL) दिलेल्या माहितीनुसार, 2022 YR1 नावाचा 72 फूट आकाराचा लघुग्रह 1 जानेवारी 2023 रोजी पृथ्वीच्या सर्वात जवळ पोहोचेल. त्याचे अंतर पृथ्वीपासून 6250000 किमी असेल. विमानाच्या आकाराचा हा लघुग्रह 21744 किलोमीटर प्रति तास (6.04 किमी/सेकंद) वेगाने पुढे पृथ्वीच्या दिशेने पुढे सरकत आहे. 


पृथ्वीवर नवीन संकट?


दरम्यान, शास्त्रज्ञांच्या मते हा लघुग्रह आपल्यासाठी पृथ्वीसाठी धोकादायक नाही. लघूग्रह आणि पृथ्वी यांच्यातील अंतर खूपच कमी असले तरीही ते पृथ्वी जवळून जाणार असून, त्याचा आपल्याचा धोका नाही.


अशा घटना का घडतात?


अंतराळामध्ये लघुग्रह, धूमकेतू, उल्का यांसारख्या असे अनेक घटक आहेत. हे घटक कधी-कधी त्यांच्या कक्षेत फिरताना पृथ्वीच्या जवळ येऊ शकतात. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीभोवतीच्या वस्तूही ग्रहाकडे आकर्षित होतात. त्यामुळे लघूग्रह, उल्का यांसारखे घटक पृथ्वीच्या अगदी जवळून जातात, पण त्याचा पृथ्वीला धोका नसतो.