इस्तांबुल : नववर्षाचं सगळीकडे मोठ्या उत्साहात स्वागत केलं जात असताना, या नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दहशतवाद्यांनी 39 निरपराध लोकांचे बळी घेतले आहेत. तुर्कीमधल्या इस्तांबुल शहरात नववर्षाचं सेलिब्रेशन सुरू असताना सान्ताक्लॉजच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यानं अंधाधुंद गोळीबार केला. यात तब्बल 39 जणांचा मृत्यू झाला असून, 40 जण जखमी असून ते रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.

ISTAMBUL ATTACK


इस्तांबुलमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रेना नाईटक्लबमध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आले होते. पार्टी सुरु असताना दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. धक्कादायक म्हणजे दहशतवाद्यांनी सांताक्लॉजच्या वेशात येऊन हल्ला केला.

रेना नाईटक्लबमध्ये पार्टीत शेकडो नागरिक नव्या वर्षाच्या स्वागतासाठी हजर होते.



इस्तांबुलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यादृष्टीने इस्तांबुल शहरात हाय अलर्टही जारी करण्यात आलं होतं.

या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्तांबुल शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र हा हल्ला कोणी आणि कशासाठी केला हे अद्यापही कळू शकलेलं नाही. कुठल्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.