टुर्कु (फिनलँड) : फिनलँडच्या टुर्कु शहरात एका व्यक्तीने अनेक लोकांवर चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून ८ हून अधिकजण जखमी झाले आहेत. तर जर्मनीच्या वुप्पेर्टल शहरात एकाची हत्या करण्यात आली आहे. बार्सिलोनात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही घटनांकडे त्याच संशयातून बघितले जात आहे.
स्पेनच्या बार्सिलोनामध्ये काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही घटना घडल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
स्पेनमध्ये दहशतवाद्यांनी गर्दीत व्हॅन घुसवली, 13 ठार
स्पेनमधील बार्सिलोना शहरात मोठा दहशतवादी हल्ला झाला. यावेळी दहशतवाद्यांनी बॉम्ब किंवा बंदुकांचा वापर केलेला नाही, तर एक व्हॅन थेट गर्दीत घुसवली.
यामध्ये तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 100 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. नेहमीच गजबलेल्या लास रमब्लास या परिसरात हा हल्ला झाला.
पोलिसांनीही चार संशयित दहशतवाद्यांचा खात्मा केला. या हल्ल्याची जबाबदारी आयसीसने स्वीकारली आहे.
गजबजलेलं ठिकाण
लास रमब्लास हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. इथे मोठ्या प्रमाणात दुकानं आणि हॉटेल्स आहेत. त्यामुळे इथे पर्यटकांची वर्दळ असते. याशिवाय इथे विविध कलाकारही आपल्या कला सादर करत असतात. त्यामुळे हे ठिकाण अगदीच गजबजलेलं असतं.
संबंधित बातम्या :
Barcelona Terror Attack: ना बॉम्ब, ना बंदूक, दहशतवाद्यांनी गर्दीत व्हॅन घुसवली, 13 ठार
स्पेनमधील हल्ल्यानंतर फिनलँड-जर्मनीत चाकू हल्ला, तिघांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Aug 2017 07:51 AM (IST)
स्पेनपाठोपाठ फिनलँड आणि जर्मनीत काही लोकांवर चाकू हल्ला करण्यात आला आहे. ज्यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -