बँकॉक : बँकॉकमधील एका शाळेच्या वसतिगृहात लागलेल्या आगीत होरपळून 17 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. पाच ते 12 वयोगटातील मुलींचा मृतांमध्ये समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 
उत्तर थायलंडच्या डोंगराळ भागातल्या जमातीतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या हॉस्टेलमध्ये रात्रीच्या वेळी आग लागली. चिआंग राय भागातील पिठाक्कीआर्त विठ्ठाया शाळेच्या दुमजली इमारतीत ही आग लागली. यात किमान 17 जणींचा मृत्यू झाला असून 5 जणी जखमी आहेत, तर काही विद्यार्थिनी बेपत्ता आहेत.

 
रात्रीच्या वेळेस आग लागल्यामुळे झोपेत असलेल्या विद्यार्थिनींना घटनेची माहिती मिळाली नाही. त्यामुळेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. भाजल्यामुळे अनेकींचे चेहरे ओळखण्यापलिकडे गेल्याची माहिती स्थानिकी वाहिनीने दिली आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस अधिक तपास करत आहेत.