Iran Terrorist Attack: ईरानमधील शिराज शहरामध्ये तीन दहशतवाद्यानं हल्ला केला आहे. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे तर 40 जण जखमी झाले आहेत. सुत्रांच्या वृत्तानुसार मृताची संख्या आणखी वाढू शकते. दरम्यान, दोन दहशतवाद्यांना पकडण्यात यश आले आहे. एकाचा अद्याप शोध सुरु आहे. 


स्थानिक मीडियानं दिलेल्या माहितीनुसार,  शिराज शहरातील शिया तिर्थावर तीन बंदूकधाऱ्या दहशतवाद्यांनी हल्ला केला.  शिया तिर्थस्थळावर मोठ्या प्रमाणात भाविक आले होते, त्यावेळी दहशतावाद्यानं अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 जण जखमी झाले आहेत. बंदूकधाऱ्यांनी अचानक गोळीबार केल्यामुळे भाविक आणि उपस्थितांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. नागरिक सैरावैरा पळत सुटले. या हल्ल्यातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. 


दरम्यान, या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर काही ठिकाणी मृताची संख्या 15 सांगितली जात आहे तर काही स्थानिकांनी या हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.