‘Succession’ Mansion Destroyed : कॅलिफोर्नियामधील लॉस एंजेलिसच्या जंगलातील लागलेल्या भीषण आगीमध्ये पॅसिफिक पॅलिसेड्समधील सर्वात महागडा असलेला आलिशान महाल सुद्धा भस्मसात झाला आहे. Luminar Technologies चे बॉस ऑस्टिन रसेल यांच्या मालकीचा हा महाल असून दरमहा $450,000 भाड्याने तो वापरात होता. 18-बेडरूमच्या या आलिशान वाड्यात वाड्याची आता केवळ राख उरली असून फोटो पाहून अंगावर शहारे येत आहेत. या आलिशान महालची किंमत 125 दशलक्ष डॉलर्स इतकी होती. डेली मेलने हा आलिशान महाल जळून खाक झाल्याचे आपल्या वृत्तात म्हटले आहे.  HBO टीव्ही वाहिनीचा शो असलेल्या “Succession” मध्ये या आलिशान घराची झलक पाहायला मिळाली होती.


25 जणांचा मृत्यू झाला, सुमारे 30 जण बेपत्ता


दरम्यान, अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीत मंगळवारपर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 30 जण बेपत्ता आहेत. एपी वृत्तसंस्थेनुसार, 90 हजार लोकांना आपत्कालीन एक्झिट अलर्ट (शहर सोडण्याचा इशारा) देण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत बाधित भागातून 50 जणांना अटक केली आहे. या लोकांना लूटमार करणे, आगीच्या ठिकाणी ड्रोन उडवणे आणि कर्फ्यूचे उल्लंघन करणे अशा अनेक आरोपांना सामोरे जावे लागलं आहे.






मंगळवारी वाऱ्याचा वेग अंदाजापेक्षा कमी होता, त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात बचाव पथकाला मोठी मदत झाली. सध्या पॅलिसेड्स आणि ईटन वगळता इतर ठिकाणी आग जवळपास आटोक्यात आली आहे. आगीत आतापर्यंत 12 हजारांहून अधिक इमारती नष्ट झाल्या आहेत, तर 155 चौरस किलोमीटरचा परिसर राख झाला आहे.


डोनाल्ड ट्रम्प भेट देण्याची शक्यता 


नॅशनल वेदर सर्व्हिसने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही अजूनही पूर्णपणे धोक्यातून बाहेर पडलेलो नाही. मात्र, मंगळवारी वाऱ्याचा वेग जेवढा वाटला होता तेवढा नव्हता. बुधवारी स्थिती आणखी सुधारू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर प्रभावित भागांना भेट देऊ शकतात. दरम्यान, अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष माईक जॉन्सन म्हणतात की, कॅलिफोर्नियामध्ये पाण्याचे गैरव्यवस्थापन झाले आहे. तेथील स्थानिक नेते आगीबाबत निष्काळजी होते.


आगीमुळे 13 लाख कोटी रुपयांचे नुकसान


रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार लॉस एंजेलिसमधील आगीमुळे सुमारे 11.60 लाख कोटी ते 13 लाख कोटी रुपयांचे ($135-150 अब्ज) नुकसान होण्याची शक्यता आहे. येथील आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात आले आहे. लोकांना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे, लॉस एंजेलिस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेटनवूड येथील उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या घरी घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असली तरी नंतर त्यांची सुटका करण्यात आली.


इतर महत्वाच्या बातम्या